साडेतीन शक्तीपीठ पैकी मुख्य असलेल्या तुळजाभवानी अर्थात तुळजापूर येथे जाणाऱ्यासाठी मुंबईकरांना खाजगी ट्रँव्हल्सचा सहारा घ्यावा लागत आहे. अनेक महिन्यापासून तुळजापूर मुंबई व मुंबई तुळजापूर अशा दोन्ही मार्गावरील आरक्षणच बंद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचे कारण कोणीच सांगत नाहीत. मात्र राज्य परिवहनच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा खाजगी ट्रँव्हल्सचा होत असून ७०० रुपयात मिळणारे तिकीट १५०० पर्यत गेले आहे.

हेही वाचा- महिन्याभरापासून नवी मुंबईला वायू प्रदूषणाच्या विळखा कायम; नेरुळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३५३ एक्युआय

सलग सुट्ट्या आल्या की तीर्थस्थळावर जाणाऱ्यांच्या भक्तांच्या गर्दीत वाढ होते. त्यामुळे राज्यात सर्व तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी सर्वच ठिकाणाहून गाड्या आणि सर्व तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडण्याचा संकल्प अनेक दशपासून सरकारने सोडला आहे. सध्या तर राज्याची राजधानी मुंबईतून तुळजापूरला जाण्यास असलेल्या गाडीचे आरक्षणच बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गाडी सुरु आहे. मात्र, मुंबई ते तुळजापूर  हा सुमारे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास विना आरक्षण करण्याचे धाडस कोणी करीत नाही. त्यामुळे असणाऱ्या गाड्या रिकाम्या जात आहेत. अगोदरच खड्ड्यात गेलेल्या राज्य परिवहन मार्गाला हा सुद्धा मोठा फटका बसत आहे. या विषयी गुरुवारी आणि शुक्रवारी तुळजापूरगाडीच्या वेळत  लोकसत्ता प्रतिनिधी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता नेरूळ वाशी मानखुर्द या तीन ठिकाणाहून जाणार्या भक्तांची संख्या मोठी होती. मात्र आरक्षण नसल्याने अनेकांनी सोलापूर , उस्मानाबाद , बार्शी या गावांची आरक्षण केली होती. तेथे सकाळी उतरून तेथून तुळजापूर गाडी पकडावी लागणार असेही विश्वंभर पाटील या प्रवाशाने सांगितले.

हेही वाचा- नवी मुंबई : अमेरिकेतून कंटेनरमध्ये आलेल्या ‘ब्लॅक ईगावांना’ला जीवदान

तीर्थक्षेत्रावर जायचे असेल तर सर्व कुटंब जाते त्यामुळे सोबत महिला लहान मुलेही असतात अशावेळी आरक्षण शिवाय आम्ही प्रवास करीत नाहीत. तुळजापूरला गाडी आहे. मात्र, आरक्षण नसल्याने जवळच्या गावाला उतरून तुळजापूर गाठणे हा द्राविडी प्राणायाम नशिबी आला असा स्त्रागा शुभांगी देवळे यांनी व्यक्त केला. सरकार कुठलेही असो फक्त छ. शिवाजी महाराजांचे नाव घेत तर विरोधीपक्ष राजधानीतून आराध्यदैवत ठिकाणी गाडी नाही या ऐवजी कुठल्या मुलीला कुठल्या नेत्याने किती फोन केले यावर चर्चा चालते. अशी संतप्त प्रतिक्रिया नेरूळ येथील मुकुंद काळे यांनी दिली.

हेही वाचा- …अन् तो शौचालयात पाणीपुरीचा ठेला ठेऊन करायचा विक्री, किळसवाणे कृत्य आले समोर

विशेष म्हणजे ठाण्याहूनही निघणाऱ्या गाडीचे आरक्षण होत नाही. त्यामुळे ही गाडी सुद्धा रिकामी जात असल्याची माहिती पनवेल डेपोतून देण्यात आली.
या बाबत मुंबई सेन्ट्रल, तुळजापूर आणि पनवेल या तिन्ही ठिकाणी तुळजापूर गाडीचे आरक्षण बंद का केले या विषयी विचारणा केली असता आम्हाला माहिती नाही. आमचे साहेब हिवाळी आधिवेशनात व्यस्त आहेत असे सांगण्यात आले. या मार्गावर रात्री एक व सकाळी एक मुंबई सेन्ट्रल वरून गाड्या आहेत तर सुट्टीत फेर्या वाढवल्या जातात. मात्र आरक्षण बंद असल्याने प्रवासीच गाडीत नसतात अशी माहिती एकाने दिली . राज्य परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले मात्र पुन्हा संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader