महावितरणच्यावतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत मुंबईच्यावतीने सादर करण्यात आलेल्या “सलवा जुडूम” हे नाटकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या “आर्यमा उवाच” या नाटकास व्दितीय क्रमांक देण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक, चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व महावितरणचे संचालक, संजय ताकसांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला आणि नाट्य कलावंतांना बक्षिसे देण्यात आली.

हेही वाचा- नवी मुंबई: लाच घेऊ नका, देऊ नका, बसमध्ये प्रवास करीत जनजागृती

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे ही नाटय स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचा आनंद घेत सर्वांमध्ये एक नवऊर्जा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले.

“महावितरण कर्मचाऱ्यांनी सादर केलेली नाटके ही व्यवसायीक तोडीची होती, अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संचालक संजय ताकसांडे यांनी सर्व कलाकाराचे कौतुक केले. तीन दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबई, भांडूप नागरी परिमंडल, कल्याण परिमंडल, नाशिक परिमंडल, जळगाव परिमंडल, कोकण परिमंडल, रत्नागिरी यांनी आपआपली नाट्य कलाकृती सादर केली.

हेही वाचा- कळंबोलीचा उड्डाणपुल दुरुस्तीमुळे बंद असल्याने उलट्याबाजूने बेकायदा प्रवास सूरु

पारितोषिक वितरण वेळी मुख्य अभियंता, धनंजय औंढेकर, कैलास हुमणे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, संजय ढोके, सह मुख्य जनसंपर्क अधिकारी, अनिल कांबळे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन), राजेंद्र पांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, रामगोपाल अहिर, नाट्य स्पर्धेचे परीक्षक रविद्र सावंत, ज्योती मिसाळ, गजानन कराळे उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते

(कंसात परिमंडळ नाव) – सर्वोत्तम नाटक निर्मिती: विजेते – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), उपविजेते – ‘आर्यमा उवाच’ (जळगाव), दिग्दर्शन: प्रथम – जितेंद्र वेदक (सांघिक कार्यालय), द्वितीय – मयुर भंगाळे (जळगाव), अभिनय पुरुष: प्रथम – संदीप वंजारी (भांडुप), व्दितीय- अमित दळवी (सांघिक कार्यालय); अभिनय महिला: प्रथम – युगंधरा ओहोळ (जळगाव), व्दितीय – वृषाली पाटील, (कल्याण); रंगभूषा व वेशभूषा: प्रथम – आर्यमा उवाच (जळगाव), व्दितीय – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय ); संगीत: प्रथम – सलावा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव); प्रकाश योजना: प्रथम – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय ), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव); नेपथ्य: प्रथम – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव). तसेच, उत्तेजनार्थ बक्षीस: किशोर साठे (सांघिक कार्यालय), शुभम सपकाळे (जळगाव), रुपाली पाटील (भांडुप), विक्रांत शिंदे (कल्याण), राम धर्मा थोरात (नाशिक), आलेखा शारबिद्रे (रत्नागिरी).