चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला जाळल्याची घटना घणसोली गावात घडली. या घटनेत शीतल खरात ही ९० टक्के भाजली आहे. तिला वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. वाहनचालक असलेल्या आरोपी अनिल खरात याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. १२ वर्षांपूर्वी अनिल आणि शीतल यांचा विवाह झाला होता. शीतल एका खासगी कंपनीत कामाला होती. मद्यपान करून आल्यानंतर अनिलचे शीतल हिच्याशी भांडण होत असे. अनिल हा शीतलच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत असे. गेल्या रविवारी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वेळी रागाच्या भरात अनिलने शीतलच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader