नवी मुंबई :  पनवेल येथील एका व्यक्तीला गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हा महिलांच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडून मैत्रीची विनंती करत होता आणि ओळख वाढल्यावर गुंतवणुकीचे आमिष दाखवत होता. तपासात त्याने केलेल्या ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नवी मुंबई : आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहणार

अजित दत्तात्रय चव्हाण असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पृथा कुलकर्णी या नावाने बनावट खाते फेसबुक या समाज माध्यमात उघडले होते. त्याद्वारे आरोपीची ओळख आकाश गायकवाड यांच्याशी झाली. त्यातून बोलणे सुरु झाले. काही दिवसांनी शेअर मार्केट मध्ये व्यवथित गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळतो असे सांगत गुंतवणूक करण्याचे सुचवले. विशेष म्हणजे आरोपी हा फोन फिर्यादींना फोन करताना लेडी व्हाईस सारख्या ऍपचा वापर करून संवाद साधत होता. त्यामुळे ऐकणाऱ्या व्यक्तीला महिलेचा आवाज ऐकू जात असे त्यामुळे आपल्याशी बोलणारी व्यक्ती पुरुष आहे हे लक्षात येत नसे.  

हेही वाचा >>> अतिवृष्टीनंतर वेदनांचा पूर; नव्याने संसार उभारण्याचे आव्हान

जास्त नफ्याच्या अमिषाला बळी पडत आकाश यांनी ३ लाख ७१ हजार रुपयांची एकूण गुंतवणूक केली. मात्र नंतर आरोपीने संवाद  बंद केला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आकाश यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अर्ज दिला. त्याची शहानिशा करून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.  गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक  दिलीप शिंदे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने  तपास सुरु केला.  तांत्रिक तपास केल्यावर  आरोपी निष्पन्न झाला. त्याला अटक करण्यात आले आहे. गुन्हयात अटक आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले २ मोबाईल फोन व १ लॅपटॉप असा एकुण ४०चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तपासात त्याने अशाच पद्धतीने  कोल्हापुर २६ लाख, चिपळुन १ लाख २५ हजार,  नागपूर ३ लाख २५ हजार , पुणे २० हजार , डोंबिवली- कल्याण चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. 