नैराश्यापोटी एका व्यक्तीने वाशी खाडी पुलावरून आत्महत्येसाठी उडी मारली विशेष म्हणजे या बाबत त्याने मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगत हे कृत्य केले . या घटनेची नोंद वाशी पोलिसांनी केली असून सदर व्यक्तीचा मृतदेह शोधकार्य सुरू केले मात्र अद्याप मृतदेह आढळून आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नवी मुंबई: वाशी बस आगार आणि वाणिज्य संकुल जून २०२३ मध्ये सुरू होणार

प्रशांत वायकर  (वय ३३) असे खाडीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो चेंबूर येथे राहणारा आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने  आशिष बुरुड  (वय ४०) या मित्राला व्हिडीओ कॉल केला. यात त्याने स्वतः वाशी खाडी पुलावर असल्याचे सांगितले व मी आता खाडीत उडी मारून आत्महत्या करत असल्याचे सांगितले व तसाच व्हिडीओ कॉल चालू ठेवत पुलावरून खाडीत उडी मारली. या बाबत आशिष याने वाशी पोलिसांना माहीती दिली. वाशी पोलिसांनी तात्काळ स्थानिक मच्छीमार आणि अग्निशमन दलाची मदत घेत शोधकार्य सुरू केले रात्री अंधार झाल्याने शोध कार्य थांबवले आणि सकाळी पुन्हा सुरू केले मात्र त्यांना उडी मारणाऱ्या व्यक्ती वा त्याचा मृतदेह आढळून आला नाही. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली.