पनवेल :  शेअरट्रेडींगमध्ये आमची कंपनी अधिकचा नफा मिळवून देईल असे आमिष दाखवून खांदेश्वर वसाहतीमध्ये राहणा-या44 वर्षीय व्यक्तीला साडेबावीस लाखांना फसविण्यात आले आहे. या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात भामट्याने साडेअठरा लाख रुपये ऑनलाईन बॅंक खात्यावर वळते करुन आणि चार लाख रोख रक्कम स्विकारुन ही फसवणूक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सीवूड्समध्ये पाच फ्लेमिंगोचा मृत्यू तर, सात जखमी

नवी मुंबई पोलीस दलाकडून ऑनलाईन शेअर ट्रेडींगचे व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी जागरुकपणे ज्या गुंतवणूकदार कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतोय त्याची खात्री कऱण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सूशिक्षित वर्गाकडून नवीन गुंतवणूक करताना कंपन्यांची माहिती घेतल्याशिवाय व्यवहार केल्याने मोठ्या प्रमाणात सूशिक्षितांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. खांदेश्वर वसाहतीमधील ४४ वर्षीय कादर शेख यांना २५ जानेवारी ते एप्रिलपर्यंत ऑनलाईन ट्रेडींग कंपनीच्या नावाने फोनवर संपर्क साधला गेला. कादर यांची फसवणूक करण्यासाठी भामट्यांनी दोन वेगवेगळे मोबाईलनंबर वापरले. मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवरुन अयान अन्सारी व अहमद या दोन व्यक्तींनी कादर यांना संपर्क साधल्यानंतर कादर यांचा विश्वास संपादनासाठी कादर यांचे इंडीयन डीमॅट खाते असल्याचे सांगण्यात आले. सध्या मिळत असलेल्या नफ्यापेक्षा अधिक नफा अल्ट्रा ग्लोबल मार्केट या कंपनीत पैसे गुंतविल्यास नफा मिळेल असे सांगून कादर यांना साडेअठरा लाख रुपये भरायला सांगीतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams zws