नवी मुंबई: पब मध्ये हप्ता दिला नाही म्हणून व्यवस्थापकावर चाकूने वार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलीस कारवाईस गेले असता त्यांनाही शिवीगाळ आणि अरेरावी आरोपींनी केली.वाशी येथील सतरा प्लाझा या व्यावसायिक इमारतीती  असणाऱ्या  अरेवीयन नाईट कॅफे नावाचा पब आहे. याच ठिकाणी रविवारी अपरात्री  विवेक भोरे आणि पंकज चव्हाण  हे दोघे आले. त्यांनी मद्य घेतले. मात्र ते पैसे देण्यास त्यांनी नकार दिलाच मात्र “अरेबियन नाईट कॅफे चालवायचे असेल तर तुला दरमहा ४० हजार रुपये हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुला तुझा धंदा करू देणार नाही” अशी धमकी दिली.  त्यावरून झालेल्या बाचाबाचीवरून आरोपी विवेक भोरे व पंकज चव्हाण या दोघांनी मिळुन व्यवस्थापक  शशीधर रमेश कोटीयान यांना  मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपी  विवेक भोर याने त्याचे ताब्यातील चाकुने शशीधर कोटीयन यांच्या  छातीवर दंडावर  उजव्या हाताचे बोटाला चाकूने वार केले. यात  शशीधर कोटीयन हे गंभीर जखमी झाले आहेत.  या अवस्थेतही कोटियन यांना आरोपींनी ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. हि घटना कळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी या ठिकाणी पथक पाठवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. जेव्हा पोलीस पथक आरोपींना ताब्यात घेत होते त्याही वेळी आरोपींनी पोलिसांनाही शिवीगाळ केली होती. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी दिली. 