पनवेल येथील कार्यक्रमात पर्रिकर यांचा इशारा
पठाणकोटचा बदला योग्य वेळी घेतला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिला.
पनवेल येथे भाजप माजी सैनिकांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. देशाची माजी सैनिकांची ४२ वर्षांपासून ‘एक श्रेणी एक निवृत्तीवेतन’ या रखडलेल्या योजनेची अंमलबजावणी सरकारने केल्याने माजी सैनिकांनी संरक्षण मंत्र्यांचा सत्कार केला.नेहमी राष्ट्रविरोधी बोलणाऱ्यांवर सामाजिक दबाव निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी अभिनेता आमिर खानचे नाव न घेता त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून घडलेल्या किस्सा सांगत नंतर त्याने केलेल्या जाहिराती पाहणे जनतेने बंद केल्याकडे लक्ष्य वेधले. काश्मीर खोऱ्यामध्ये कोणत्याही दहशतवाद्याने बंदूक काढल्यास त्या दहशतवाद्याची हल्ला करण्याची वाट न पाहता, सैनिकांनी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहण्याऐवजी शत्रूचा नायनाट करण्याच्या सूचना असल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader