नवी मुंबई : एक मराठा लाख मराठा अशी हाक देत अंतरवाली सराटीपासून निघालेला मोर्चा नवी मुंबई पोहोचल्यापासून राज्य शासन खडबडून जागे झाले होते. त्यामुळे अखेर जरांगे पाटील यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून त्याचा अध्यादेशही प्राप्त झाल्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोष असून आमचा नेता इमानदार असे फलक फडकवणारा मराठा बांधव व त्याचे सहकारी कालपासूनच जोशात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नवी मुंबई : मराठा दिंडी मोर्चा; आता लवकरच मुंबईकडे प्रयाण

हेही वाचा – मराठा मोर्चाचा मुक्काम आज वाशीतच, आंदोलनकर्ते पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रवाना

आतापर्यंत विविध जातींच्या सुधारणांसाठी जे जे नेते पुढे आले त्यांनी आपलेच घर भरण्याचं काम केलं असल्याचा आरोप या मराठा बांधवांनी केला असून आमचा नेता मात्र इमानदार असल्याचा फलक गळ्यात अडकवून आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमचा सेनापतीच इमानदार असल्यामुळे आम्हाला पराभवाची भीती अजिबात नाही. आम्हाला यश मिळणारच याची खात्री हे मराठा बांधव आंदोलनात देत होते. त्यांचा हा आपल्या सरसेनापतीवरचा विश्वास सार्थ ठरला असून या मराठा आंदोलनकर्त्याच्या गळ्यातील संदेश सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil demands regarding maratha reservation accepted by the government message of maratha samaj bandhav is getting attention ssb