नवी मुंबईतील सिडको प्रदर्शनी केंद्रात कामगार विभागाच्या अधिनस्त असलेल्या बाष्पके संचालनाल आयोजित कालावधीत बॉयलर इंडिया २०२२  प्रदर्शन, कार्यशाळा व चर्चासत्र कार्यक्रमात आलेल्या व्हीआयपीच्या गाड्यांवर जाहिरात फलक पडल्याने पाच ते सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात झाली आणि काही वेळात वादळी वारे आणि पाठोपाठ जोरदार पाउस सुरु झाला यात सदर कार्यक्रमाचा टोलेजंग लावण्यात आलेला फलक वार्याने पडला. पार्किंग मध्ये लावण्यात आलेला फलक पडल्याने त्या खाली कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्याच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले.

हेही वाचा : “खोक्यांचा विषय हा ‘मातोश्री’ला…”; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

यात दोन गाड्यांच्या समोरच्या काचांना तडे गेले एका गाडीचा साईड मिरर तुटला आणि सर्वच गाड्यांना मोठ्या प्रमाणात चरे पडले. तसेच फलकाचा काही भाग एका अग्निशमन दलाच्या गाडीवरही पडला . मात्र घटना अशा ठिकाणी घडली कि भरपाई कोणाला मागावी ? अशी प्रतिक्रिया उपस्थित एका व्यक्तीने दिली. फलक लावल्या नंतर हवेने पडून नये म्हणून त्याला मोठी छिद्र पाडली जातात जेणेकरून हवा मार्ग मोकळा होऊन वेग मंदावतो व फलक पडत नाही मात्र या ठिकाणी असे करण्यात न आल्याने फलक पडला अशी माहिती येथे काम करणाऱ्या एका कामगाराने दिली.

Story img Loader