Manoj Jarange Patil Maratha Quota Rally Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. २० तारखेला जालना येथून निघालेला मोर्चा लवकरच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात धडकेल. यात हजारोंच्या संख्येने वाहने आणि लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी असणार आहेत. आज येथेच मुक्काम करून उद्या (२६जानेवारी) मुंबई कडे मार्गक्रमण करेल. त्यामुळे नवी मुंबईत मोर्चा मार्गात अडथळा न येऊ देता तसेच इतर सामान्य वाहतूकही सुरळीत चालावी यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी जागोजागी वाहतूक बदल केले आहेत. हे बदल वाचूनच घराबाहेर पडा असे आवाहन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

नोड प्रमाणे वाहतूक बदल देण्यात आले आहेत. रस्त्यावर कुठे प्रवेश बंदी आणि त्याला पर्यायी मार्ग कसे ते नमूद करण्यात आले आहे. 

Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील

हेही वाचा…२५ जानेवारीला सर्व बाजार समिती राहणार बंद – एपीएमसी प्रशासन 

नविन पनवेल वाहतुक विभाग

१) प्रवेशबंदी :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून कोनफाटाकडे येणारी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून  कोनफाटाकडे येणारी वाहने कळंबोली सर्कल येथुन इच्छित स्थळी जातील.

२) प्रवेशबंदी:- मुंबई-पुणे  द्रुतगती मार्गावरून   बोर्ले टोल नाक्याकडे येणा-या वाहनांना बोर्ले टोल नाका येथुन पळस्पेकडे प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- मुंबई-पुणे  द्रुतगती मार्गावरून  बोर्ले टोल नाक्याकडे येणारी वाहने खालापुर व खोपोली मार्गे इच्छित स्थळी जातील.

३) प्रवेशबंदी :- खालापुर रसायनी कडून दांडफाटा मार्गे शेंडुग कडे येणारी वाहनांना पळस्पेकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- खालापुर रसायनी कडून दांडफाटा मार्गे शेंडग कडे येणारी वाहने मुंबई-पुणे  द्रुतगती मार्गावरून   कळंबोली सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

४) प्रवेशबंदी :- गोवामार्गे मुंबई व नवी मुंबईकडे व जेएनपीटीकडे येणारे वाहनांना पळस्पे सर्कल येथुन प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- गोवामार्गे मुंबई व नवी मुंबईकडे येणारे वाहनांना खारपाडा येथून डावीकडे साईगाव, दिघोडे गाव, चिरनेर मार्गे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा…मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी

पनवेल शहर वाहतुक विभाग

१) प्रवेशबंदी मार्ग डि पॉईंट पासून पुणे व गोवाकडे जाणारी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे

पर्यायी मार्ग:- डि पॉईंट पासून पुणे व गोवाकडे तसेच इतरत्र जाणारी वाहने कळंबोली सर्कल येथुन चिंचपाडा अंडर पास-गव्हाणफाटा-उरण मार्गे चिरणेर दिघोडे गाव-सायगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) प्रवेशबंदी मार्ग पनवेल शहर, नवीन पनवेल शहर येथुन कोनकडे जाणारी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- पनवेल शहर, नवीन पनवेल शहर येथुन कोनगावाकडे जाणारी वाहने ही कळंबोली सर्कल मार्ग इच्छित स्थळी जातील. वाहनांना डि पॉईंट पासून प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

३) प्रवेशबंदी मार्ग: कळंबोली सर्कल, करजाडे, पनवेल शहर येथुन जेएनपीटी कडे जाणारे

पर्यायी मार्ग:- कळंबोली सर्कल, कंरजाडे, पनवेल शहर येथुन जेएनपीटीकडे जाणारे वाहने शहरातील अंतर्गत मानिइति स्थली जातील

गव्हाण फाटा वाहतूक विभाग

१) प्रवेशबंदी :- जेएनपीटी एनएच-४ बी वरुन तसेच गव्हाणफाटा येथुन किल्ला जंक्शन कडे येणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- जेएनपीटी एनएच-४ बी वरुन तसेच गव्हाणफाटा येथुन किल्ला जंक्शन कडे येणारे सर्व प्रकारची वाहने उलवे एन्ट्री पॉईंट येथुन नवी मुंबई एअरपोर्ट प्रवेशव्दार येथील सेवा रस्त्याने (सर्व्हिस रोडने ) चिंचपाडा मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) प्रवेशबंदी :- जेएनपीटी ते पनवेल दरम्यान एनएच-३४८ओ या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना पनवेल पर्यंत सदर मार्गावरील पदयात्रा सदर रस्त्यावरुन मार्गस्थ होई पर्यंत जेएनपीटी येथुन प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : महापालिका शिक्षकांवर सर्वेक्षण कामांचा भार!

सीवुडस् वाहतूक विभाग

१) प्रवेशबंदी :- किल्ला जंक्शन (एनआरआय), सीवूड सेक्टर नं. ५० सिग्नल, अक्षर सिग्नल, टी. एस. चाणक्य सिग्नल, वजराणी सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल येथुन पामबिच मार्गावरुन जाणा-या सर्व वाहनांना वाशी, कोपरी, एपीएमसी तसेच मुंबई, ठाणे कडे जाण्यास प्रवेशबंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- किल्ला जंक्शन (एनआरआय), सीवूड सेक्टर नं. ५० सिग्नल, अक्षर सिग्नल, टी. एस. चाणक्य सिग्नल, वजराणी सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल येथुन पामबिच मार्गावरुन जाणारी सर्व वाहने ही वाशी, कोपरी, एपीएमसी येथे पामबीच वरुन न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मागनि इच्छित स्थळी जातील. तसेच किल्ला जंक्शन येथुन मुंबईकडे जाणारी वाहने ही उलवे अटल सेतू मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील. तसेच किल्ला जंक्शन येथुन मुंबई ठाणे कडे जाणारी वाहने ही अपोलो हॉस्पीटल येथुन उरणफाटा मार्गे मुंबई व ठाणेकडे इच्छित स्थळी जातील,

सीबीडी वाहतूक विभाग

१) प्रवेश बंदी:- सीबीडी सर्कल येथुन भाऊ पाटील चौक-दिवाळे गाव सिग्नल ते किल्ला जंक्शन येथुन पामबिचकडे व मुंबई, ठाणेकडे तसेच वाशी, कोपरी, एपीएमसी कडे जाणा-या सर्व वाहनांना किल्ला जंक्शन येथुन पामबिच मार्गाने  जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- सीबीडी सर्कल येथुन भाऊ पाटील चौक-दिवाळे गाव सिग्नल ते किल्ला जंक्शन येथुन पामबिचकडे व मुंबई, ठाणेकडे तसेच वाशी, कोपरी, एपीएमसी कडे जाणारी सर्व वाहने पामबीच वरुन न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मागनि इच्छित स्थळी जातील. तसेच किल्ला जंक्शन येथुन मुंबईकडे जाणारी वाहने ही उलवे अटल सेतू मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.

तसेच किल्ला जंक्शन येथुन ठाणे कडे जाणारी वाहने (पदयात्रे साठी येणारी वाहने वगळून) ही अपोलो हॉस्पीटल येथुन उरणफाटा मार्गे मुंबई व ठाणेकडे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा…पनवेल : डॉक्टर निवासाच्या जागी कॅथलॅब सेंटर?

एपीएमसी वाहतूक विभाग

१) प्रवेश बंदी:- तुर्भे ते ऍरेंजा सर्कल वाशी मार्गे जाणारे व येणारे बसे व इतर सर्व प्रकारची वाहने यांना तुर्भे रेल्वे स्टेशन उडानपुल येथुन व छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथुन प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- तुर्भे रेल्वे स्टेशन उड्डाणपूलावरून  वाशीकडे येणारी वाहने व छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथुन जाणारी वाहने ही सायन- पनवेल हायवे ने इच्छित स्थळी जातील 

२) प्रवेश बंदी:- कोपरखैरणे व्हाईट हाउस कडून पामबीच कोपरीकडे येणारे सर्व वाहनांना कोपरी उड्डाणपुलावर ठाणे-बेलापूर मार्ग येथुन प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- कोपरखैरणे व्हाईट हाउस कडून पामबीच कोपरीकडे येणारे सर्व वाहने तुर्भे व तुर्भे रेल्वे स्टेशन या मार्गाने तसेच अंतर्गत रस्त्याचा वापर करून इच्छित स्थळी जातील. 

३) सानपाडा ब्रिज शिकार हॉटेल येथुन अन्नपूर्णा सिग्नलकडे जाणारे व येणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात येत आहेत. पर्यायी मार्ग:- सानपाडा ब्रिज शिकारा  हॉटेल येथुन अन्नपूर्णा सिग्नलकडे जाणारे व येणारे वाहनांनी सायन-पनवेल हायवे ने व अंतर्गत रस्त्याचा वापर करून इच्छित स्थळी जातील

वाशी वाहतूक विभाग

१) प्रवेश बंदी – ब्लू डायंमड चौक येथुन कोपरीकडे व पामबिचकडे तसेच एपीएमसी कडे जाणा-या सर्व वाहनांना ब्लु डायमंड चौक येथुन प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथुन एरेंजा  सर्कलकडे जाणा-या सर्व वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथुन बंदी करण्यात येत आहे. वाशी हद्दितील रहीवाशांना आपली वाहने पामबिच मार्गावर आणण्याकरीता बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- ब्लू डायंमड चौक येथुन कोपरीकडे व पामबिचकडे तसेच एपीएमसी कडे जाणारी सर्व वाहने ही कोपरखैरणे वाशी रेल्वे स्टेशन या रस्त्याने पुढे शीव -पनवेल महामार्गने  मुंबई, पुणे कडे मार्गक्रमण करू शकतात तसेच अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जातील.

२) प्रवेश बंदी – २६ जानेवारीला सकाळी ५ वाजल्या पासून ब्लू डायंमड चौक येथुन कोपरीकडे व पामबिचकडे तसेच एपीएमसी कडे जाणा-या सर्व वाहनांना ब्लु डायमंड चौक येथुन मुंबईकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तसेच तुर्भेकडुन शीव -पनवेल महामार्गाचा वापर करीत  मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारचे वाहनांना तुर्भे येथुन शीव -पनवेल महामार्गाने  मुंबईकडे जाण्यास बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- ब्लू डायंमड चौक येथुन कोपरीकडे व पामबीच मार्गाने  तसेच एपीएमसी कडे जाणा-या सर्व वाहनांना ब्लु डायमंड चौक येथुन कोपरी सिग्नल, बोनकोडे उडाणपुल व्हाईट हाउस कोपरखैरणे मार्गे मुंबई, ठाणेकडे मार्गाने इच्छित स्थळी जातील. अथवा उरण फाटा, अपोलो हॉस्पीटल, उलवे, अटलसेतू मार्गे मुंबई कडे इच्छित स्थळी जातील. अथवा ठाणे बेलापूर मार्गे ठाणे, मुंबई कडे जातील. 

वाहतूक बदल करताना काही अपवादात्मक वाहनांना वगळण्यात आले आहे….. 

जीवनावश्यक वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पदयात्रे सोबत असलेली वाहने, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही. 

हेही वाचा…पनवेल : डॉक्टर निवासाच्या जागी कॅथलॅब सेंटर?

वाहतूक बदल कधी पर्यंत ? 

वाहतुक नियमन व नियंत्रणात करण्यात आलेला बदल हा २५ जानेवारी सकाळी १० वाजल्या पासून २६ जानेवारी  पदयात्रा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातुन मुंबई हद्दित जाईपर्यंत अंमलात राहील. पदयात्रा जसजशी पुढे मार्गस्थ होईल त्याप्रमाणे पदयात्रेच्या मागील वाहतुक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी वरील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा.असे आवाहन वाहतूक शाखेचे  पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.