Manoj Jarange Patil Maratha Quota Rally Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत असून लोणावळ्याहून मराठा मोर्चा निघाला असून आज रात्री १२ वाजता हा मराठा मोर्चा वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी लोकसत्ताला दिली आहे. मराठा मोर्चा नवी मुंबई कधी पोहोचणार याची उत्सुकता असून हा मोर्चा उलवे मार्गे नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथून पांभीज मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…जरांगे पाटीलांचे समर्थक पनवेलमधून जेवणाची शिदोरी घेऊन वाशीकडे मार्गस्थ

त्यासाठी पाम बीच मार्गावर विविध ठिकाणी मोर्चाच्या नियोजनाची तयारी करण्यात आली असून पालिका मुख्यालयाच्या इथून काही मराठा मोर्चा बांधव हे बेलापूर येथील तेरणा विद्यालय येथे जाणार आहेत. तर चाणक्य चौकीतून गणपती तांडेल मैदाना कडून नेरूळ सेक्टर 14 येथील त्यांना शाळेमध्ये मोर्चाला येणाऱ्यांची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे पांभीज मार्गावर आणि ठिकाणी मराठा मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते उपस्थित असून सर्वांनाच मोर्चा कधी येणार याची उत्सुकता लागलेली आहे. नवी मुंबईत मोर्चाची लगबग सुरू असताना मोर्चा नवी मुंबई पोहोचण्यासाठी मध्यरात्र होणार असल्याने आता पालिका प्रशासन पोलीस विभाग, वाहतूक विभाग यांचीही लगबग पाहायला मिळत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha morcha of manoj jarange patil will reach navi mumbai at 12 in the night psg