मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी उरण तहसील कार्यालयावर वाढती महागाई व बेरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढला होता. यावेळी राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेची अन्न सुरक्षा नष्ट करण्यासाठी सुरू केलेली कारवाई त्वरित थांबवून केवळ करपात्र कुटुंबाचे रेशनिंग बंद करून स्वस्त धान्य दुकानातून साखर,तेल,डाळी या सारख्या इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी ही मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : तुर्भे वाहतूक पोलीस भोगताहेत नरकयातना

उरण मधील चारफाटा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महागाई कमी करा,बेरोजगारांना रोजगार द्या,महागाई वाढविणारे केंद्र व राज्य सरकार चले जावं,कामगार, महिला, युवक ,शेतकरी एकजुटीचा विजय असो,केंद्र सरकार हाय हाय च्या ही जोरदार घोषणा देत हा मोर्चा चारफाटा उरण ते पालवी रुग्णालय,खिडकोळी नाका,गांधी चौक ते उरण तहसील असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चा कार्यालयावर पोहचल्या नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कामगार नेते भूषण पाटील,जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील,अमिता ठाकूर,कुसूम ठाकूर,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव रामचंद्र म्हात्रे यांनी आपले विचार मांडले.

हेही वाचा >>> महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल

या मोर्चा द्वारे उरण मधील उरण पनवेल रस्त्यावरील नादुरुस्त पूल दुरुस्त करा, उरण मधील रस्त्याना पडलेले खड्डे त्वरित बुजवा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तर शेवटी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी मोर्चाला सामोरे येत मोर्चाचे निवेदन स्वीकारले यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे ही उपस्थित होते.मोर्चा मध्ये सी आय टी यु,डी वाय एफ आय,जनवादी महिला संघटना व किसान सभा या संघटनांनी सहभाग घेतला होता. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता.