ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटक यांच्याकरिता बोटींग सफर त्याचबरोबरजैवविविधतेची महिती होण्यासाठी विविध दालने सुरू करण्यात आलेली आहेत . अद्याप फ्लेमिंगो दाखल झाली नसल्याने बोटिंग सुरू करण्यात आली नाही. परंतु या केंद्राला दिवसेंदिवस पर्यटकांची पसंती वाढत आहे. मागील वर्षी ७ हजार तर यंदा ११ हजार पर्यटकांना भेटी दिल्या आहेत.
ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येत असतात. यामध्ये पेंटट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर इत्यादी प्रकारच्या पक्षांचा समावेश आहे. खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे ही माहिती होण्यासाठी वन विभागाने याठिकाणी या केंद्राची उभारणी केली आहे. त्यामुळे याठिकाणी पक्षीनिरक्षण, नौकाविहार या सुविधांचा समावेश आहे. याठिकाणी खारफुटीची माहिती होण्यासाठी तसेच बोटीने आतमध्ये जाता न येणाऱ्या नागरिकांकरिता बांबूचा वॉक टेल म्हणजे पूल उभारण्यात आला आहे. या बांबूच्या पुलावरून येणारे नागरिक येथील खारफुटी वनस्पतीचे महिती देण्यात येते. त्यामुळे या केंद्रात पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
आद्यप परदेशी पक्षांचे आगमन झाले नाही त्यामूळे बोटींग बंद आहे.मात्र इतर पक्षी निरीक्षण करण्यासाठी पर्यटकांचा कल वाढत आहे. –प्रशांत बहादुरे ,वनपरिक्षेत्र अधिकारी ,वन विभाग.ऐरोली सागरी जैवविविधता केंद्र
ऐरोली केंद्र
सन २०२१-२२ सन २०२२-२३
प्रौढ ५९५१ ८७८४
मुले १५०६ २१९०
ज्येष्ठ नागरिक २८० ३५१
एकूण ७७३७ ११३२५
महसूल ३८५९४०७ २३७२२४५