एपीएमसी घाऊक बाजारात घटस्थापना, नवरात्रोत्सव खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
एपीएमसीमधील घाऊक बाजारात नवरात्रोत्सव निमित्ताने बाजारपेठत विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. या बाजारातपेठेत घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने नवी मुंबईसह मुंबई उपनगरातूनही मोठय़ा प्रमाणात ग्राहक येत असतात.
नवरात्री उत्सवात घटस्थापना पूजा महत्त्वाचा विधी असतो. यासाठी लागणारे कलश यंदा अनोखे पाहावयास मिळत आहेत. गतवर्षी मातीचे मटके असलेल्या कलशाला केवळ रंगकाम आणि काचेची कलाकुसर करण्यात आली होती. यंदा घटावर मोत्याचे मनी, लेस यांची कलाकुसरही पाहावयास मिळत आहे. हे कलश राजस्थान, गुजरातमधून मुंबईत दाखल झाले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे.
तसेच विविध रंगी चुनरी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही चुनरी ५०० ते २ हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. तसेच पूजेचे साहित्य खरेदीला ही ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
देवीचे अलंकार पाच हजारांपर्यंत
देवीचे अलंकार यामध्येही विविध प्रकारची डिझाइन उपलब्ध आहेत. हे दागिने १ हजार ते ५ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. कुंकू, करंडा यामध्ये नवनवीन कलाकुसर पाहावयास मिळत आहे. तसेच पूजेचे साहित्य खरेदीला ही ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
फळांच्या मागणीत वाढ
- नवरात्री उत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असल्याने फळांना अधिक मागणी आहे. घाऊक बाजारात फळांची आवक घटली असून भाव २० ते ३० टक्यांनी वाढले आहेत. सफरचंद, डािळब, मोसंबी, सीताफळ यांना मागणी आहे.
- काश्मिरी सफरचंद : घाऊक बाजारात १२ ते १४ किलोला ७०० ते १००० रुपये तर करकोळ बाजारात प्रतिकिलो १५० ते २०० रुपये.
- डाळिंब : घाऊक बाजारात ५० ते १८० रुपये तर करकोळ बाजारात १५० ते २०० रुपये.
- मोसंबी : घाऊक बाजारात ८ डझनला ८०० ते १००० रुपये तर करकोळीत १५० रुपये डझन बाजारभाव आहेत.
- सीताफळ : घाऊक बाजारात प्रतिकिलो ३० ते १०० तर करकोळ बाजारात ८० ते १५० रुपयांना उपलब्ध आहेत.