दिवाळीनिमित्त वाशी येथील मॉलमध्ये तसेच घाऊक व किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट, वाशी सेक्टर ९ येथील मार्केट, कोपरखरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, साीबीडी, नेरुळ या परिसरांतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी असून वाशीतील रघुलीला मॉल, बिग बाजार, डी मार्ट गर्दीने फुलले आहेत.
नवी मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या ग्राहकपेठा आणि प्रदर्शनांतही अनेक महिला बचत गटांनी स्टॉल उभारले असून त्यांनाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या आवडीनिवडी व कल पाहून वस्तू मांडल्या आहेत.

ऑनलाइन शॉपिंगमुळे फटका
नोकरीधंद्यानिमित्त व्यग्र असणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन शॉपिंगला आधिक पसंती दिली आहे. दिवाळीनिमित्त वेगवेगळय़ा साइटवर ऑफर सुरू आहेत. ऑनलाइन वस्तू तुलनेने माफक किमतीत उपलब्ध असल्याने त्यांच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांना याचा थेट फटका बसला आहे.

Story img Loader