मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाचे कोरम पूर्ण नसल्याने एपीएमसीतील धोरणात्मक निर्णय  त्याचबरोबर मान्सूनपूर्वकामांना ही खीळ बसली होती.  अत्यावश्यक कामातअंतर्गत येणाऱ्या नालेसफाईला विशेष परवानगी मिळावी यासाठी एपीएमसी प्रशासनाने पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठवला होता. याला पणन संचालकांनी हिरवा कंदील दिला असून लवकरच नालेसफाईला सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पालिका मुख्यालय परिसरातील कचऱ्याचा ढीग तात्काळ उचलला

नवी मुंबई शहराप्रमाणेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारात पावसाचे पाणी साचू नये याकरिता प्रशासनातर्फे मे मध्ये मान्सूनपूर्व नाले सफाई, वृक्ष छाटणी, विद्युत कामे केली जातात.  मात्र यंदा एपीएमसी बाजाराचे संचालक मंडळ पूर्ण नसल्याने डिसेंबर महिन्यांपासून संचालक मंडळाच्या बैठक होत नाहीत.  त्यामुळे धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामे देखील रेंगाळली होती. परंतु नालेसफाई ही अत्यावश्यक सेवा असून ही काम होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे पावसाचे पाणी साचू नये याकरिता एपीएमसी प्रशासनाने पणन विभागाकडे अत्यावश्यक कामात नाले सफाई करण्याला परवानगी मिळावी असा प्रस्ताव पाठवला होता. त्याला पणन संचालकांनी मंजुरी दिली असून पुढील आठवड्यात एपीएमसीतील नालेसफाईला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडी यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marketing director approved pre monsoon work in apmc market zws