नवी मुंबई शहरामध्ये जसजसा मे महिना पुढे पुढे जात आहे तसं शहरात खोदकामे होताना दिसत आहे. खोदकामांबाबतची मुदत २५ मे रोजी संपणार असून त्यापूर्वी तरी कामे संपतील का? असा प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहेत. शहरातील विविध चौकांचे तसेच  रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणांची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर,  कुठे मलनिस्सारण वाहिन्या, तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा लाईन बदलण्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे खोदकामांमुळे नागरीकांची डोकेदुखी संपताना दिसत नाही. खोदलेल्या रस्त्यांमुळे नवी मुंबईकर उन्हाळ्याच्या चटक्याबरोबरच शहरातील खोदकामांना त्रासलेले आहेत. पालिकेने लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत अशी मागणी केली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : ही कसली यांत्रिक साफसफाई…? यांत्रिक साफसफाई मशीनच्या मागे, मात्र सफाई कामगारांकडून झाडूने साफसफाई

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अनेक मूळ गावठाणे आहेत. याच मूळ गावठाणालगतचे रस्ते कॉक्रीटीकरण करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणीस रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत.

सीवूड्स विभागात असेच पाणीपाईपलाईन बदलण्याचे काम नव्याने सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे रस्ते खोदकाम केल्यानंतर साफसफाई कामगारांना साफसफाई करताना मोठी अडचण निर्माण होते. नव्याने रस्त्याच्या खोदकामाला पालिकेने परवानगी देणे बंद केलं असलं तरी अत्यावश्यक कामे म्हणून खोदकामे करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई शहरातील धोकादायक वृक्षांच्या छाटणीला सुरुवात, कडक उन्हाळा असल्याने सुकलेल्याच झाडांची छाटणी

शहरात कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत तक्रार प्राप्त झालेल्या परिसरात पाण्याची पाईपलाईन बदलण्यासाठी खोदकामे करण्यात आली आहेत. पालिकेने दिलेल्या मुदतूपूर्वीच कामे पर्ण करण्यात येतील. नागरीकांच्या पाण्याबाबतच्या तक्रारीमुळे खोदकाम करण्यात आले आहे.लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यात येतील .

अरविंद शिंदे ,कार्यकारी अभियंता….

शहरात कमी दाबाने पाणीपुरवठ्याबाबत तक्रार प्राप्त झालेल्या परिसरात पाण्याची पाईपलाईन बदलण्यासाठी खोदकामे करण्यात आली आहेत. पालिकेने दिलेल्या मुदतूपूर्वीच कामे पर्ण करण्यात येतील. नागरीकांच्या पाण्याबाबतच्या तक्रारीमुळे खोदकाम करण्यात आले आहे.लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यात येतील .

-अरविंद शिंदे ,कार्यकारी अभियंता….

अवकाळी पावसासारखी अचानक खोदकामे …

शहरात एकीकडे कॉक्रीटीकरणाची कामे केली मोठ्या प्रमाणात केली जात असताना दुसरीकडे अचानक काही विभागात खोदकामे केल्यामुळे रात्री चांगला असलेल्या रस्त्यावर दुसऱ्या दिवशी खोदकामे पाहायला मिळत असल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive excavation work on progresses in navi mumbai city zws
Show comments