नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर ५ येथील प्रमिला पॅलेस इमारतील वाढदिवसाचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली होती. यात दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आग लागल्याचे कळताच वाशी अग्निशमन दल या ठिकाणी पोहचले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी दोन तासात आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र या दुकानात वाढदिवसाच्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. ज्यात फुगे व अन्य रबरी व प्लास्टिक साहित्य तसेच कागदी वस्तू स्टिकर्स आदी त्वरित आग पकडणाऱ्या वस्तू होत्या. त्यामुळे काही वेळातच पूर्ण दुकानाच्या पेट घेतला. हे दुकान सलग दोन गाळ्यात  होते. आगीत रबर व प्लास्टिक  साहित्य असल्याने पाणी टाकल्यावर आग विझत जरी असली तरी धुगधुगी राहत होती ज्या मुळे  काही वेळात ती आग पुन्हा लागत होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण दोन तासात मिळाले तरी साडे चार वाजले तरी कुलिंगचे काम सुरूच होते. अशी माहिती वाशी अग्निशनमन दलाने दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire at a shop in sanpada sector 5 navi mumbai mrj