नवी मुंबई: जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा… Jalna Lathi Charge: जालना येथील घटनेचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतही आंदोलन
या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास माथाडी कामगार काम बंद आंदोलन करेल असा इशारा देखील सरकारला देण्यात आला आहे.