माथाडी कामगारांच्या समस्या बाबत वारंवार मागणी करून देखील सरकारने त्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही. तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणारचं असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला.
हेही वाचा- स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईतील इतर शासकीय संस्थांचा निरुत्साह
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने त्वरीत लक्ष घालावे व त्यांची सोडवणुक करावी यासाठी दि. २५ जानेवारी २०२३ रोजी माथाडी भवन येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियन तर्फे मुकादम कार्यकर्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील म्हणाले की, आम्ही अनेकवेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलन केली तसेच शासनाच्या विविध खात्यांकडे आणि मंत्रीयांकडे पाठपुरावाही केला मात्र सरकार माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणूनच आता जर का सरकारने माथाडींच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी कार्यवाही केली नाही तर येत्या १ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणारचं असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला.
हेही वाचा- अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमधील टाकाऊ रसायनांचे दोन टॅंकर तळोजातील नाल्यात रिते करताना रंगेहाथ पकडले
माथाडी कामगारांच्या समस्यांमध्ये माचाही सल्लागार समितीची पुर्नरचना करणे पुर्नरचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणुक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुर्नरचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन पुर्नरचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणूका करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, अनुज्ञाप्ती धारक तोलणार, मापाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह खात्याने संबंधितांची समिती गठीत करावी व पोलीस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलीस यंत्रणेकडून त्वरीत काढावे, अशा विविध मागण्या आहेत.