नवी मुंबई -: एमआयडिसीतील महापे गाव तसेच अडवली भुतावली गावात सुमारे एक वर्षापासून अनियमित पाणी पुरवठा होतो. गेल्या काही आठवड्यापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई नेहमीच जाणवत असते. गेल्या वर्षभरापासून पाण्याची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात नवीन बटाटा हंगामाने दर घसरण

याबाबत ग्रामस्थांमार्फत एम आय डी सी व महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुराव्याकेल्या नंतर फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा आरोप चंद्रकांत कदम या ग्रामस्थाने केला . पाणी समस्या जैसे थे वैसेच राहिली आहे.त्यामुळे या अघोषित पाणीबाणी विरोधात महापे  आणि अडवली भुतावली गावातील ग्रामस्थ लोकांनी आठ दिवसांपूर्वी समंधीत अधिकाऱ्यांचे भेट घेतली. त्याही वेळेस केवळ आश्वासन देण्यात आले. त्यामुळे  पुन्हा एकदा आक्रमक झाले असून शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी एम आय डी सी आणि मनपा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत जाब विचारला.यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व रमेश डोळे उपस्थित होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई कचरामुक्त शहर नाहीच; आजही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

संजय देसाई (शहर अभियंता) एमआयडीसी विभागाकडून या ठिकाणी पाणी पुरवठा होतो तर नियंत्रण मनपाचे असते. या समस्ये  बाबत एमआयडीसी विभागाला कळवण्यात आले आहे. काही तांत्रिक समस्या असून आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित होईल.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mavi mumbai water shortage in midc mahape area zws