उरण : वायू विद्युत केंद्रात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात होरपळलेल्या तिन्ही कामगारांचा मृत्यू झाला आहे. मात्र मंगळवारी दगावलेल्या उरणच्या डोंगरी गावातील तंत्रज्ञ कामगार कुंदन पाटील यांच्या भावाने एक मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार जेवणाची वेळ झाली असल्याने आधी जेवून घेऊ या अशी सूचना कुंदने केली होती. मात्र काम पूर्ण करूनच जेवूया असे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने हे तिघेजण काम करीत राहिले आणि तो स्फोट झाला,त्याचवेळी जर जेवणाची सुट्टी घेऊन घटनेच्या ठिकाणावरून ते तिघेजण बाहेर पडले असते तर कदाचित या कामगारांचे जीव वाचू शकले असते अशी माहिती कामगाराने आपल्या भावाला दिल्याचे भावाने स्पष्ट केले आहे. या घटनेतील ही माहिती समोर आल्याने तसेच रविवारची सुट्टी असल्याने घटनेच्या ठिकाणी कामगारांची संख्या कमी होती अन्यथा यापेक्षा अधिक कामगारांना आपला जीव गमवावा लागला असता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा