वी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून एमडी अर्थात मेथाक्वालोन अंमली पदार्थ हा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या कडून ७ लाख ८३ हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिलीप राठोड आणि ताहीर अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एपीएमसी परिसरातील सेक्टर २९ वाशी एकता नगर झोपडपट्टी पुनीत कॉर्नर येथे दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीस आणणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंग झडती घेतली असता दिलीप याच्याकडे ३ लाख ७३ हजार ८०० रुपये किंमतीची उग्र वास येणारी तपकिरी रंगाची पावडर जप्त करण्यात आली. त्याचे वजन  ३४.१५ ग्रॅम, अंमली पदार्थाचे निव्वळ वजन ३१.१५ ग्रॅम होते. याची किंमत प्रति ग्रॅम १२ हजार रुपये प्रमाणे आहे.

आणखी वाचा-नवी मुंबईत परदेशी नोकरीच्या बहाण्याने ११२ जणांची ८१ लाखांची फसवणूक

याशिवाय ४ लाख ९ हजार २०० रुपयांची ३७.१० ग्रॅम, अशीच पावडर ताहीर मोहमंद अलीकडे आढळून आली. त्याची तपासणी केली असता मेथाक्वालोन अंमली पदार्थ असल्याची खात्री पाटल्यावर दोघांना अटक करण्यात आली. अशा प्रकारे दोघांकडे मिळून एकूण ७ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मेथाक्वालोन अंमली पदार्थ आढळून आला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Md drugs worth 7 lakhs seized by apmc police two arrested mrj
Show comments