जैन्य धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय आता नवी मुंबईत देखील लागू करण्यात आला आहे. जैन समुदायासाठी पर्युषण काळ हा अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे जैन धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन या काळात मांस विक्रीवर बंदी आणावी, असा प्रस्ताव मीरा भाईंदरचे भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला होता. तो संमत करण्यात आला असून नवी मुंबईत ९ ते १७ सप्टेंबरपर्यंत मांस विक्री बंद करण्याचा आदेश पालिकेने दिला आहे.
याआधी मीरा-भाईंदर महापालिकेने आठ दिवस तर, मुंबई महापालिकेने चार दिवस पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांसविक्रीवर बंदी घातली आहे.

Story img Loader