उरण : अलिबाग मध्ये पिकणारा औषधी गुणकारी पांढरा कांदा उरणच्या बाजारात विक्रीसाठी आला आहे. या कांद्याला बाजारात मागणी आहे. कांद्याच्या एका माळेसाठी २०० ते २५० रुपये दर आकारला जात आहे. कांद्याच्या आकारानुसार दर आकारला जात आहे.वाढत्या उष्णतेवर हा कांदा फायदेशीर असून यंदा चांगलाच भाव खात आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे हा कांदा राज्यभर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये येणारे पर्यटक मोकळ्या हाताने परत जात नाहीत.

हा गुणकारी औषधी कांदा जाताना घेऊन जात आहेत. अलिबाग-मुरूडमध्ये येणारे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अलिबाग-वडखळ मार्गाने मुंबई, पुण्याकडे निघताना सफेद कांद्याची माळ, कलिंगड, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे आवर्जून खरेदी करत आहे. यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी आहे.

कृषी विभागाने पांढरा कांदा लावडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून या वर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मागणी आहे. अलिबागच्या शेतात पिकविलेला सेंद्रिय पांढरा कांदा विक्रीसाठी आणला जात. या कांद्याला चांगली मागणी आहे. ग्राहक भाव न करता कांदा विकत घेत आहेत. उरणच्या बाजारात नाक्यावर मोठ्या प्रमाणात या कांद्याची विक्री केली जात आहे. कृषी विभागाने पांढरा कांदा लावडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून या वर्षी लागवड क्षेत्र वाढले आहे. अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या हा कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला मागणी आहे.

औषधी गुण:

अलिबागच्या पांढऱ्या कांद्यात व्हिटॅमिन अ, ब आणि क तसेच पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन आदी पोषक तत्वे आहेत. त्याचप्रमाणे अँटी इन्फेमेट्री आणि अँटी ऑक्सीडंट गुणधर्म आहेत. यामुळे पचनशक्ती वाढते, फायबर असल्याने बद्धकोष्ठता सुधारते त्याचप्रमाणे केस, हृदय आणि रक्तदाबावरही उपयुक्त असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कांद्याला अधिकची मागणी आहे.

Story img Loader