नवी मुंबई – आज रविवार दिनांक १८.६.२०२३ रोजी पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत मेगब्लॉक घेण्यात आल्याने या कालावधीत या मार्गावरील वाहतूक सेवा बंद असेल. त्यामुळे पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ०३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.४५ ते दुपारी ०३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हेही वाचा – सिडको कडून मशिदला भूखंड दिल्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाकडून उलवेत मोर्चा

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवाही रद्द राहतील. आज ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Story img Loader