नवी मुंबई महापालिका शेत्रातमहामार्गावर तसेच शहराअंतर्गत रस्त्याचे चित्र दिवसेंदिवस बदलत आहे.काही ठिकाणी खडी व डांबरीकरणाचे रस्ते आता कॉंक्रीटचे होऊ लागले आहेत.परंतू मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाक्याच्या पुढे असलेल्या वाशी उड्डाणपुलावरुन दुचाकी ,चारचाकी वाहन चालवताय मग नक्की जरा जपूनच गाडी चालवा.
हेही वाचा- नवी मुंबई : महापालिका सीबीएसई शाळेत क्रीडामहोत्सव
वाशी उड्डाणपुलावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर डांबर व रेतीचे उंचवटे तयार झाले आहेत. उन्हाच्या प्रखर झळा व पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले डांबर वितळून त्यात टाकलेली छोटी वाळू यामुळे या उड्डाणपुलावर डांबराचे उंचवटे तयार झाले आहेत. त्यामुळे केव्हाही या ठिकाणी दुचाकी व चारचाकी चालवताना जरा जपूनच वाहन चालवा कारण अचानक रस्त्यात दिसलेल्या उंचवड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे व डांबराच्या वितळण्यामुळे रस्त्यावर विविध आकाराचे उंचवडे तयार झाल्याने येथे गाडी घसरुन अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
हेही वाचा- अमृत योजनेअंतर्गत प्रक्रियायुक्त पाणी विक्रीसाठी नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार
ऐन पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाशी टोलनाका चालवत असलेल्या एमईपी कंपनीकडून वाशी उड्डाणपुलावर डांबर व वाळू मिश्रण करुन खड्डे बुजवण्यात आले.परंतू पावसाळा गेल्यानंतर सध्या असलेल्या कडक उन्हाच्यामुळे उड्डाणपुलावर डांबर व खडीचे उंचवटे झाले आहेत. मुंबईहून वाशी टोलनाका ओलांडून पुढे उड्डाणपुलावर आल्यावर अचनाक समोर येणाऱ्या उंचवड्यामुळे दुचाकीस्वार गाडी घसरुन पडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नुकत्याच राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे संबंधित महापालिकेच्या हद्दीतील उड्डाणपुल त्या त्या महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे वाशी उड्डाणपुल महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी हस्तातंरीत झाल्यामुळे आता या उड्डाणपुलावर झालेल्या उंचवट्यामुळे अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही आता नवी मुंबई पालिकेने घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा- रायगड जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
नवी मुंबई महापालिकेकडे वाशी उड्डाणपुल रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेची आहे.त्यामुळे पालिकेने या उड्डाणपुलावरील धोकादायक उंचवटे दूर करावेत, अशी मागणी नागरिक महेश चव्हाण यांनी केली आहे. वाशी उड्डाणपुल पालिकेकडे देण्यात आला असल्याने आता शहरातील पालिकेकडे असलेल्या रस्त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.