भांडुप येथे राहणाऱ्या बेरोजगार युवकास सौदी येथे नोकरीचे आमिष दाखवून त्याला इराण मध्ये पाठवले मात्र तेथेही चार महिने राहूनही नोकरी न मिळाल्याने परत यावे लागले. हा प्रकार भांडुप येथे राहणाऱ्या दोन युवकांच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून यात शेकडो बेरोजगारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.पुष्कर सोना , संग्राम सोंडगे, आणि निरंजन देशमुख असे यातील आरोपींची नावे आहेत. तर साहिल घोरपडे यांनी तक्रार दिलेली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : शिवसेना उपशहरप्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी, वाचा नेमकं काय घडलं…
घराची बेताची परिस्थिती असल्याने अर्धवट शिक्षण सोडत नोकरीसाठी भांडुप येथील साहिल घोरपडे हा एकोणीस वर्षीय युवक प्रयत्न करत होता. एका ओळखीच्या व्यक्तीकडून त्याला परदेशात नोकरी लावणाऱ्या पुष्कर याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्याच्याशी फोनवर बोलणे झाल्यावर त्याने साहिल यास सीबीडी येथे बोलावले. त्याने संग्राम याच्या कार्यालयात जाण्यास सांगितले व तेथे गेल्यावर संग्राम याने सौदी येथे नेव्ही शिपमध्ये महिना २० हजार रुपयांची नोकरी मिळेल असे सांगून पारपत्र घेतले. दोन महिन्यांनी सौदी अरेबिया येथे रेड सी मारिन सर्व्हिस कंपनीचे नोकरी बाबत पत्र संग्राम याने मोबाईलवर पाठवले. प्रत्यक्ष भेट घेतल्यावर वय कमी असून चार-पाच महिने थांबण्यास सांगितले. त्यानुसार साहिल हा थांबला. पाच महिन्यांनी दुबईतील प्लायवर्ड हॉटेलमध्ये नोकरी असल्याचे संग्राम याने सांगितले तसेच तिकीट व्हिसा मोबाईल वर पाठवला.
हेही वाचा >>> नवी मुंबईतील २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
ठरलेल्या दिवशी स्वतः साहिल तसेच त्याचे मित्र अमित व प्रणव पारधी असे दुबईला गेले. तेथून नोकरीच्या ठिकाणी ते स्वतःच गेले. त्याठिकाणी एका गेस्ट हाऊस मध्ये एक महिला तिघेही राहिले . मात्र कुठेही नोकरीबाबत माहिती मिळाली नाही. एक महिन्याने संग्राम याने फोन करून तुम्ही इराणमध्ये जा तेथे नोकरी असल्याचे सांगितले व इच्छा नसताना तिघेही पॅसेंजर शिप द्वारे गेले. त्याचे तिकीट संग्राम यांचे तिकीट तेथेही एका एजंटने काढून दिले. त्याठिकाणी जेथे साहिल व इतर दोन मित्रांना ठेवले होते तेथे त्यांच्या प्रमाणेच आलेले ३० ते ४० जण राहत होते. दुबई आणि इथेही राहण्याचे जेवणाचे खर्च स्वतःच भागवावे लागत होते. चार महिने उलटूनही नोकरी न मिळाल्याने शेवटी अमित भारतात आल्यावर अजून एक महिना वाट पाहून साहिलसुद्धा भारतात आला. या दरम्यान केवळ संग्राम हा संपर्कात होता. भारतात आल्यावर नोकरी दिली नाहीस, पैसे तरी दे म्हणून अनेकदा मागे लागल्याने १ लाख रुपये पुष्कर याने दिले. मात्र अनिल याला एकही रुपया अद्याप दिला नाही. हा सर्व घटनाक्रम जून २०२२ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला आहे. शेवटी कंटाळून दोघांनी सीबीडी पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिला. सदर अर्जाची शहानिशा करून संग्राम, पुष्कर आणि निरंजन देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.