नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्या कडून ६० ग्रॅम वजनाचा ६ लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे. 

अश्फाक अस्लम मुकादम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकादम हा एपीएमसी परिसरात अमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती. खबरीने दिलेल्या माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नजीक शालिमार हॉटेल परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, श्रीकांत नायडु, पोलीस हवालदार रमेश तायडे, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, राकेश आहिरे, या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

आणखी वाचा-उदवाहकाची जागा ठेकेदाराने मोकळी सोडल्याने ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

यात आरोपी मुकादम अडकला. त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या कडून ६० ग्रॅम भुकटी (पावडर) आढळून आली. त्याची तपासणी केली असता ती भुकटी एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ असल्याचे समोर आले. मुकादम याची चौकशी केली आता सदर अमली पदार्थ विक्री करण्यास तो आला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याला अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, हे करीत आहेत.