सोमवारपासून आठवडाभर तपासणी; १ मे पासून सेवा सुरू होण्याची शक्यता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) च्या वतीने ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई मेट्रोसाठी वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र दिल्यानंतर गेले तीन महिने प्रतीक्षा केली जात असलेली आयुक्त मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) विभागाची सोमवार १७ जानेवारीपासून चाचणी करण्यात येणार आहे. मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा मानला जात असून सिडको प्रशासनाने यासाठी महामेट्रो आणि सीएमआरएस यांच्यात दुवा निर्माण करण्याची भूमिका पार पाडल्याने ही चाचणी दृष्टिक्षेपात आली आहे. ही सेवा जानेवारी महिन्यात सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्ना होता मात्र करोनाची तिसरी लाट पसरू लागल्याने हे प्रयत्न निष्पळ ठरले आहेत. आता नवी मुंबईची ही सेवा करोना साथ ओसरल्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
सिडकोने महामुंबई क्षेत्रात दळणवळणाची साधने निर्माण करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच खर्चाचा ६७ टक्के हिस्सा उचलून नवी मुंबईत मानखुर्द ते वाशी ही पहिली रेल्वे आणण्यात सिडकोला यश आले आहे. विमानतळासारखा आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ प्रकल्प प्रगतीपथावर असताना गेली सात वर्षे अनेक कारणामुळे रखडलेली नवी मुंबईतील पहिली रेल्वे मेट्रो सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी सिडकोने चार मेट्रोचे मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर लांबीच्या पहिल्या मेट्रो मार्गाचे काम मे २०१२ रोजी सुरू करण्यात आले आहे. या मार्गातील खारघर येथील सेंट्रल पार्क ते पेंदार या ५.१४ किलोमीटर मार्गाची स्थापत्य, विद्युत आणि तांत्रिक कामे पूर्ण झाल्याने ऑगस्टमध्ये आरडीएसओकडून ऑसिलेशन व इमर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी पूर्ण करण्यात आली. आरडीएसओकडून या चाचणीचे ऑक्टोबर महिन्यात प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यामुळे शेवटची महत्त्वाची चाचणी मानली जाणारी आयुक्त मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)च्या प्रतीक्षेत सिडको आणि महामेट्रो होती.
सिडकोने या कामावर देखरेख व संचालन करण्याचे काम नागपूर, पुणे मेट्रोचे काम पाहणाऱ्या महामेट्रोकडे सोपविले आहे. तेव्हापासून या कामाला गती आली असून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सेवा लवकरात लवकर लोकार्पण व्हावी यासाठी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. सीएमआरएसचे पथक सोमवारपासून या चाचणीला सुरुवात करणार असून पहिल्या टप्प्यात ते या मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांची चाचणी करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात या पाच किलोमीटर मार्गावरील रूळ आणि तांत्रिक बाजू तपासून पाहणार आहे. त्यासाठी त्यांना एक आठवडय़ाचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन टप्प्यांत तपासणी
- सोमवारपासून या चाचणीला सुरुवात करणार आहे.
- पहिल्या टप्प्यात मेट्रोसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांची चाचणी करण्यात येईल.
- दुसऱ्या टप्प्यात पाच किलोमीटर मार्गावरील रूळ आणि तांत्रिक बाजू तपासणी होणार आहे.
महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त?
सीएमआरएसकडून या सर्व चाचणीचा अहवाल रेल्वे महामंडळाकडे सुपूर्द केला जाणार असून त्यानंतर भारतीय रेल्वे बोर्ड या नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या सेवेला हिरवा कंदील दाखविणार आहे. यासाठी आणखी एक ते दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता सिडको उच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या करोनाची तिसरी लाट असल्याने शासकीय यंत्रणा या लाटेचा सामना करण्यासाठी सक्रिय आहेत. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असल्याने ही मेट्रो सेवा तात्काळ सुरू करण्याची घाई केली जाणार नाही. त्यामुळे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर या सेवेचा शुभारंभ आता १ मे या महाराष्ट्रदिनी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.