नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एका बारा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याचे  समोर आले आहे. या प्रकरणी तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी एका सतारा वार्षिय युवकला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. 

तुर्भे इंदिरा नगर येथील एक बारा वर्षीय मुलगी हरवली असल्याची तक्रार शुक्रवारी तिच्या पालकांनी तुर्भे एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केली  होती. मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. अकराच्या सुमारास अपहरण झालेली युवती जखमी अवस्थेत  सापडली असून तिच्यावर डी वाय पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. अशी माहिती तिच्या एका नातेवाईकाने पोलिसांना दिली. पोलीस पथक रुग्णालयात दाखल झाले. मात्र तो पर्यंत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.  

तिच्या चेहऱ्यावर दगडासारख्या वजनदार वस्तुने प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. मुलगी जखमी अवस्थेत जिथे सापडली टि जागा निर्जन होती. तिथे तपासणी करण्यात आली. चौकशीत घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने तिचा मोबाईल सापडला असे सांगून तिच्या पालकांना दिला होता. हे समोर येताच पोलिसांनी त्या युवकला ताब्यात घेत चौकशी केली असता किरकोळ वादातून दोघांची भांडणे होऊन झटापट झाली. त्यात ती पडली असता त्या युवकाने तिच्या डोक्यात दगड घातला. ही माहिती समोर आली. संशयित अल्पवयीन असल्याने अटक करण्यात आली नाही. 

अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.