जयेश सामंत

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या रडार आणि डॉप्लर यंत्रणेमुळे पाम बीच मार्ग आणि त्यालगत असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर आलेले गंडांतर सिडको आणि केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने गेल्या तीन वर्षांपासून राबविलेल्या शोधमोहिमेनंतर अखेर दूर झाले आहे.

Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
new Thane railway station is being built between Thane and Mulund stations near psychiatric hospital
नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग, उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश
Mumbai Railway Development Corporation floated tenders for constructing Chikhloli station between Ambernath and Badlapur
चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून दोन निविदा
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

सिडकोच्या एनआरआय संकुलालगत असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या पट्ट्यात ही रडार यंत्रणा उभारण्यात येणार होती. यामुळे तीन हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प आणि जमिनीचे व्यवहार ठप्प होतील असा अहवाल सिडकोनेच केंद्र सरकारला सादर केला होता. पाहणी दौरे, तांत्रिक अहवालांनंतर हे रडार आणि निरीक्षण यंत्रणा बेलापूरलगत शहाबाज आणि नियोजित विमानतळाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डुंगी गावालगत हलविण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पाम बीच परिसरातील आलिशान बांधकाम प्रकल्पांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने डिसेंबर २०२५ चे लक्ष्य अंतिम केले आहे. विमानतळाच्या उभारणीत महत्त्वाचा टप्पा असलेल्या रडार आणि डॉपलर यंत्रणांच्या उभारणीत अडचण होती. सिडकोमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विमानतळासाठी तीन ठिकाणी रडार यंत्रणा उभी केली जाणार आहे. यापैकी पहिली रडार यंत्रणा पाम बीच मार्गावरील एनआरआय संकुलामागील बाजूस असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस उभारण्यात येणार होती. याशिवाय दुसरी रडार यंत्रणा विमानतळाच्या अंतर्गत भागात तर तिसरा रडार हा माथेरानच्या डोंगरावर उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

विमानतळाच्या अंतर्गत भागातील रडार यंत्रणेशिवाय बाहेरील बाजूस उभारण्यात येणारे रडार आणि डॉपलर यंत्रणा विमानांच्या परिचलनासाठी महत्त्वाची मानली जात आहे. डीपीएस शाळेमागे हे रडार उभे केले असते तर बांधकाम क्षेत्रातील तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली असती असा अहवाल सिडकोने केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे सादर केला होता. या रडारच्या प्रभाव क्षेत्रामुळे आसपासच्या परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा येणार होत्या. याशिवाय पाम बीच मार्गालगतचे काही बहुचर्चित बांधकाम प्रकल्पही यामुळे गोत्यात येण्याची चिन्हे होती. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा इतरत्र हलविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला शोध अखेर बेलापूरलगत असलेल्या ढाकले बेट आणि विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या डुंगी गावालगत येऊन थांबला आहे.

हेही वाचा >>>सिडको विरोधात एल्गार; जमीन संपादनाला नागाव, केगाव, चाणजेसह इतर गावातील नागरिकांचा विरोध

माथेरानच्या डोंगररांगांवर अडथळ्यांचा प्रवास

या विमानतळासाठी तिसरी रडार यंत्रणा ही विमानतळाच्या पूर्वेकडे असलेल्या माथेरानच्या डोंगररांगांमध्ये उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सिडको आणि विमानतळ प्राधिकरणाने आतापर्यंत ११ जागांची पाहणी केली आहे. दाट जंगल आणि पोहोचण्यास अवघड असणाऱ्या या डोंगररांगांपैकी तीन जागांची निश्चिती आतापर्यंत करण्यात आली असून यापैकी एक जागा ही पोलीस वायरलेस संपर्क इमारतीच्या लगतची ठरविण्यात आली आहे. या जागेचे भूसंपादन करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिडकोच्या अहवालानुसार डीपीएस शाळेच्या मागील बाजूस रडार यंत्रणा उभी केली असती तर ८३.२७ हेक्टर क्षेत्रफळाच्या जमिनीवर उभारण्यात आलेली आणि १७० हेक्टर विक्रीयोग्य असलेली जमीन धोक्यात येण्याची शक्यता होती. यामुळे ५८५० कोटी रुपयांच्या जमिनीवर आणि बांधकाम प्रकल्पांवर परिणाम होईल असा सिडकोचा दावा होता.

प्रस्तावित विमानतळामुळे यापूर्वीच या संपूर्ण पट्ट्यातील इमारतींच्या उंचीवर बंधने आली असून यामुळे नव्या यूडीसीपीआरमध्ये प्रस्तावित असलेले वाढीव चटई क्षेत्र पूर्णपणे उपयोगात आणणे बिल्डरांना शक्य होत नसल्याची ओरड आहे. काही बांधकाम प्रकल्प पूर्ण असून विमान प्राधिकरणाची परवानगी मिळत नसल्याने भोगवटा प्रमाणपत्रे रखडली आहेत. अशा परिस्थितीत डीपीएस शाळेच्या मागील बाजूस रडार यंत्रणा उभी राहिली असती तर हे मोठे बांधकाम प्रकल्प आणखी गोत्यात येण्याची शक्यता होती. यासंबंधी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

हेही वाचा >>>नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक चालक रस्त्यावर

पाम बीच’वर मोठे प्रकल्प

सिडकोने पाम बीच मार्गावर नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरच राज्यातील खासदार, आमदार, न्यायाधीश आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसाठी ६०० आलिशान घरांचा मोठा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे.

याच मार्गावर एनआरआय संकुलालगत देशातील एका मोठ्या उद्याोगपतीकडून बंगले तसेच मोठ्या घरांचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे.

रडार आणि निरीक्षण यंत्रणा बेलापूरलगत शहाबाज आणि नियोजित नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डुंगी गावालगत हलविण्याचा निर्णय झाला.

Story img Loader