नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र ) मिलिंद भांबरे यांची नियुक्ती झाली आहे. आयुक्त बिपिनकुमार सिंग यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपला होता, तेव्हा या जागी अनेक अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू होती.

हेही वाचा… केडीएमटी बसला बेलापूर इथे लागली आग

नवी मुंबईने मला खूप प्रेम दिले, माझ्या पोलीस कारकीर्दमधील नवी मुंबईतील अनुभव सुखद होता अशा शब्दात बिपिंकुमार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नवी मुंबई हे अत्यंत सुसंस्कृत व सुशिक्षित लोकांचे शहर असून मी माझ्या परीने गुन्हे रोखण्याचा, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा… मद्यधुंद अवस्थेत स्कूल बस चालवणारा गजाआड; सुदैवाने चाळीस विद्यार्थी सुरक्षित

३६५ कोटींचे हिराँइन – अंमली पदार्थ जप्त करणे, कोट्यावधी रुपयांचा गुटखा पकडणे, चरस गांजा अशा अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे अशा कारवाई बिपिनकुमार यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. तर दुसरीकडे सायबर गुन्ह्यातील वाढ, साखळी चोरीच्या वाढत्या घटना, पोलीस विभाग अंतर्गत धुसफूस अशा घडामोडींमुळे त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली.

Story img Loader