पनवेल : मुंबई गोवा महामार्गावरील खड्यांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन त्यांनी या महामार्गावर रविवारपासून पनवेल येथील पळ्स्पे फाटा येथून पदयात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. परंतु शुक्रवारी सायंकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विभागाने दिलेल्या माहितीनूसार शनिवारी सकाळी याच महामार्गावरील कामांची स्थिती पाहणी दौरा पत्रकारांसोबत मंत्री चव्हाण यांनी पळस्पे फाटा येथून आखला आहे. मंत्री चव्हाण यांचा हा पाचवा पाहणी दौरा आहे.

हेही वाचा >>> आता घरबसल्या भाडेकरूची माहिती ऑनलाईन भरा, पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही, वाचा नेमकी प्रक्रिया काय आहे?

uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया
Aditya Thackeray meets Devendra Fadnavis for the third time in a month Mumbai news
आदित्य ठाकरे महिनाभरात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Maharashtra Breaking News : ठाकरे गटाच्या देवेंद्र फडणवीसांशी भेटीगाठी वाढल्या? यामागे नेमकं काय? आदित्य ठाकरे म्हणाले…
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
devendra fadanvis
गतिमान प्रशासनासाठी मुख्यमंत्र्यांचे नियोजन,सरकारची सुधारित कार्यनियमावली; प्रशासकीय शिस्तीचा आग्रह

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पदयात्रेला उत्तर म्हणून सरकारचे या महामार्गावरीव बांधकामाकडे लक्ष असल्याचे या दौ-यातून मंत्री चव्हाण यांचा दाखविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे मनसैनीक मुंबई गोवा महामार्गावरील खड्यांमुळे आक्रमक झाले आहेत. पनवेल येथील सभेत मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी सरकारला भिती वाटेल असे आंदोलन रस्ते सूधारण्यासाठी करा असे आवाहन केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले.

हेही वाचा >>> ओढ घरी जाण्याची, पण धास्ती जिवाची; सारसोळे दुर्घटनेतील नागरिकांची व्यथा..

मुंबई गोवा महामार्गावरी खडयांच्या निमित्ताने कोकणीवासियांना राज ठाकरे यांनी साद घातली. सरकारचे प्रतिनिधी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीय मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिकेने जातील यासाठी सरकारी अधिकारी व रस्ता बांधणा-या ठेकेदारांवर दबाव वाढवीत आहेत. या दरम्यान मनसे आक्रमक झाल्याने मंत्री चव्हाण यांनी मनसेच्या भूमिकेविरोधात पत्र काढून श्रेयजीवी म्हणून मनसेच्या पवित्र्याला हिनवले. मनसेने यापूर्वी अमित ठाकरे हे मुंबई गोवा महामार्गावर पदयात्रा काढतील असे जाहीर केले. मात्र ही पदयात्रा पुढे ढकलून मनसेचे मुंबई,ठाणेसह राज्यातील नेते या पदयात्रेत सामिल करुन पदयात्रा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित केली. मनसेची रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु होणारं आहे आणि शनिवारी मंत्री चव्हाण यांचा पाहणी दौरा सकाळी नऊ वाजल्यापासून पनवेलमधून कासूपर्यंत आखण्यात आला आहे.

Story img Loader