पनवेल : मागील १३ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत कोकणवासियांना बुधवारी पनवेलमध्ये एकत्र करुन निर्धार मेळावा घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यापूर्वी मंगळवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनी सर्व कार्यक्रम बाजूला सारुन पाहणी दौरा हाती घेतला. गणेशोत्सवापूर्वी पळस्पे ते कासू या ४२ किलोमीटर महामार्गातील एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. मंत्री चव्हाण यांनी गेल्या दिड महिन्यात महामार्गावर पत्रकारांसोबत चौथ्यांदा पाहणी दौरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई गोवा महामार्गात तळकोकणातील रस्ते कॉंक्रिटीकरणाचे झाले असले तरी पळस्पे ते इंदापूर या पल्यावरील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. समाजमाध्यमांवर सरकारविषयी संताप व नाराजी व्यक्त होत असल्याने हा महामार्ग कॉंक्रिटीकरणाचा निर्णय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतला. मात्र सुरुवातीलाच हा निर्णय मंत्री गडकरी यांनी का घेतला नाही? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. खड्ड्यांमुळे शेकडो अपघाती बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली.

हेही वाचा : वाढदिवस साजरा करताना तरुणावर चाकूने सपासप वार, वाशीतील धक्कादायक घटना

मंगळवारी मंत्री चव्हाण यांनी पाहणी दौरा केल्यावर ४२ किलोमीटरपैकी २२ किलोमीटरवरील एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरणाचे काम झाले असून येत्या गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिकेचे काम ठेकेदार पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणीवासियांना याच मुद्यावर बुधवारी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा : पनवेल : स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची तिरंगा दुचाकीफेरी

उच्च न्यायालयाने या महामार्गाच्या कामाबद्दल अनेकदा सरकारवर ताशेरे ओढले, रस्ते विकास महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले तरी कोकणवासियांचे खड्ड्यांमुळे होणारे हाल संपलेले नाहीत. महामार्ग लवकर बनला नाही तर लोकसभेत केंद्र व राज्यातील सत्तेत असणाऱ्यांना मतदान करायचे नाही, असा निर्धार समाजमाध्यमांवर केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हा महामार्ग अनेक नेत्यांचे भवितव्य ठरविणार असल्याची चर्चा आहे.