मुलुंड येथे राहणारे जेष्ठ नागरिक  प्रकाश शिंदे  बुधवारी काही कामानिमित्त बाहेर पडले. मात्र परत त्यांना घरी जाण्याचा मार्ग आठवेना. त्यात घर शोधत शोधत ते थेट नवी मुंबईतील महापे येथे आले. नेमके याच ठिकाणी रविवारी स्वच्छता मोहीम करणाऱ्या सामाजिक संस्थेतील लोकांना ते आढळून आले. त्यांनी आस्थेने केलेल्या चौकशीत आजोबांची कैफियत समोर आली. त्यामुळे पोलिसांची मदत घेत शिंदे यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले गेले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई :एपीएमसीत भाज्या महागल्या; पावसामुळे, पितृपक्ष पंधरवड्यात भाज्यांना मागणी असल्याने दरात १०-२०रुपयांनी वाढ

रविवारी देशभरामध्ये स्वच्छता अभियान राबविले गेले. “एक तास स्वच्छतेसाठी” या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील प्रभात ट्रस्ट या नाका कामगारांसाठी कार्यरत संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम आखली गेली होती. यासाठी  नाका कामगारांच्या निवारा शेडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रभातचे स्वयंसेवक सकाळी साडेआठ वाजता रबाळे रेल्वे स्थानकाजवळील कामगार नाक्यावर पोहोचली.. या मोहिमेत व्यसनमुक्ती, व अन्य समस्यांसाठी समुपदेशन करणारे जीवन निकम हे सहभागी झाले होते. नाका कामगारांच्या साठी ठेवण्यात आलेल्या बाकड्यावर एक जेष्ठ नागरिक झोपले होते. त्यांना उठवत चौकशी केली असता त्यांना स्मृतिभ्रंशचा आजार असल्याची शंका जीवन यांना आली. त्यांना समुपदेशनची सवय असल्याने त्या जेष्ठ नागरिकाला त्यांनी बोलते केले. त्यांचे नाव प्रकाश शिंदे असून मुलुंड येथील आहेत .एवढीच माहिती समोर आली. त्यावरूनच ते हरवले असल्याची खात्री पटली. संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश थोरात यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा >>> उरण मध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान वाचवासाठी उपोषण; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघटना आयोजक

काही वेळातच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश चव्हाण , पोलीस हवालदार प्रवीण भोसले, मुकुंद कुलकर्णी,  पोलीस नाईक रोहन वैती , श्रीकांत चवणे हे सदर ठिकाणी पोहचले. या पथकाने शिंदे यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली मात्र त्यांना काही आठवत नसल्याने तपास खुंटला होता. शेवटी मुंबई पोलीस ठाण्याची हरवलेल्या व्यक्तींची ऑन लाईन माहिती तपासली असता शिंदे हे बुधवार पासून मुलुंड येथून बेपत्ता असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तक्रारदाराशी संपर्क करून त्यांना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. एक दीड तासात शिंदे यांचा नातू आला. ओळख पातळ्यांवर पोलिसांनी शिंदे यांना त्यांच्या नातवाच्या स्वाधीन केले.अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली. याबाबत अधिक माहिती सांगताना डॉ प्रकाश थोरात यांनी सांगितले की शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी तात्पुरते अन्यत्र घर भाड्याने घेतले आहे. त्यामुळे शिंदे यांना घरचा रस्ता आठवत नव्हता. मात्र समुपदेहक जीवन यांच्यामुळे शिंदे बोलते झाले आणि आता त्यांच्या कुटुंबियात सुखरूप आहेत. याचा आनंद वाटतो.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missing grandfather handed over to relatives by volunteers in cleanliness drive with help of police zws
Show comments