नवी मुंबई – खोके सरकार अल्पायुषी ठरणार असून वादग्रस्त विधाने करून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करण्याचे काम शिंदे सरकार करत असून, जनतेचा पैसा हवा तसा वापरला जात असल्याचा आरोप युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत केला आहे.
जनतेचा पैसा कसा वापरला जात आहे यावर सध्या कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे, ईडी सरकार अत्यावश्यक असलेल्या प्रकल्पांचा पैसा गरज नसलेल्या सुशोभीकरणावर खर्च करत आहे. अल्पायुशी खोके सरकारची ही उधळपट्टी थांबवण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी आले तरच या उधळपट्टीवर नियंत्रण येणार आहे. भाजपा कोणत्याही प्रकारे ठाकरे कुटुंबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असली तरी जनताच निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना योग्य प्रत्युत्तर देईल. जनतेच्या दरबारातील हा निकाल अल्पायुशी सरकारच्या विरोधात जाणार असल्याने त्यांच्यांमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही. खरे विषय लपवण्यासाठी शिंदे गटातील गद्दार उठसूठ शिवसेनेवर टीका करीत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईत केला.
राज्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुका तातडीने घेणे गरजेचे आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मात्र, जनतेच्या दरबारातील हा कौल भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे, ते निवडणुका घेण्याची हिंमत करीत नाहीत. महागाई, बेळगावचा प्रश्न यावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिंदे गट आणि भाजपवाले वादग्रस्त विधाने करीत आहेत. स्वत:चा पगार वाढवून चांगली पदे पदरात पाडण्यासाठी शिंदे गटातील गद्दारांनी शिवसेनेवर टीका करणे सुरू केले आहे. मात्र हे जास्त दिवस चालणार नाही. राज्यातील ईडी सरकार हे अल्पायुशीच आहे. निवडणुकांमध्ये ईडी सरकारला जनता त्यांची जागा दाखवणार आहे, असाही विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना खासदार राजन विचारे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई संपर्कप्रमुख निलेश पराडकर, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या दौर्याला ऐरोली येथून सुरूवात झाली होती. मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी त्यांच्या दौर्यात सहभागी झाले. मोटरसायकलींची रॅलीही काढण्यात आली. ठिकठिकाणी युवा सेनाप्रमुखांचे भव्य स्वागत करण्यात आले.
आपली एकजुट अशीच ठेवायची आहे
शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात आलेले हे ईडी सरकार लवकरच पडणार आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आपली एकजूट अशीच ठेवण्याचे आवाहन केले. शिंदे गटाने स्वत:साठी खोके घेऊन महाराष्ट्राला धोके दिले आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी आपली एकजूट अशीच राहू द्या, असे उपस्थितांना आवाहन करून आदित्य ठाकरे यांनी गद्दारांचा जोरदार समाचार घेतला.
हेही वाचा – Maharashtra Kesari 2023: महेंद्र गायकवाड की शिवराज राक्षे? कोण होणार महाराष्ट्र केसरी
नवी मुंबईत आज युवा सेनाप्रमुखांचा दौरा ऐरोली येथून सुरू झाला. दिवा कोळीवाडा चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. वाशीमधील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सानपाडा येथे शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते नेरूळ गावात नव्यात उघडण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन झाले.
क्रिकेटचा आनंद लुटला
सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी स्टेडियमवर शहाबाज गावातील ग्रामस्थांचे गावकीचे क्रिकेट सामने सुरू आहेत. या स्टेडियमला युवासेना प्रमुखांनी भेट दिली.