होमिओपॅथीला राजाश्रय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जयंतीनिमित्त “हिम्पाम” ( Homoeopathic Integrated Medical Practitioners Association of Maharashtra (HIMPAM) ) नवी मु्ंबई यांच्या वतीने १० एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला गेला, त्या वेळी ते बोलत  होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिम्पाम’ नवी मु्ंबई ही संघटना गेली अनेक वर्षे जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करीत आहे. या वर्षी हा दिवस नवी मु्ंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात साजरा करण्यात आला. या वेळी नवी मु्ंबईमध्ये  ३० ते ४० वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या होमिओपॅथिक डॅाक्टरांचा सत्कार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा >>>बेलापूर येथील खाऊगल्लीच्या अतिक्रमणावर पालिकेची धडक कारवाई ,साहित्य जप्त

या वेळी गणेश नाईक यांनी होमिओपॅथी शास्त्र आणि आरोग्य यावर मत मांडले. नवी मुंबई डॉक्टरांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेत लवकरच होमिओपॅथिक ओपीडी चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संघटनेने दिलेल्या निवेदनातील सर्व प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही नाईक यांनी दिली. 

 डॉ. प्रतीक तांबे म्हणाले की,  होमिओपॅथिक डॅाक्टरांनी कोराना काळात नवी मु्ंबई महानगरपालिका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्या डॉक्टरांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नुकत्याच रहित केल्या आहेत, त्याविषयी पालिकेने पुनर्विचार करावा तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये होमिओपॅथिक ओपीडी सुरू करावी, अशी आग्रही मागणीही डॉ. तांबे यांनी केली.

हेही वाचा >>>नवी मुंबई : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० दिवसात १०.५० कोटी मालमत्ता कर वसूली

नवी मु्ंबई मनपा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांनी कोरोना काळात पालिकेच्या रुग्णालयात उत्तम प्रकारे सेवा दिल्याचे सांगितले.

या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. एस. टी. गोसावी, प्रशासक,महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद,मुंबई, मनपा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, नवी मु्ंबई ‘हिम्पाम’चे अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे आदी उपस्थित होते.