नवी मुंबई -महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसाने मराठीचा अभिमान बाळगा.तुम्ही  कोणाशीही बोलताना मराठीत बोला. देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भाषेचा व आपल्या राज्याचा अभिमान असेल तर आम्ही मराठीचा अभिमान का बाळगू नये. आपल्या भाषेचा अभिमान असताना मराठी माणसे विविध भाषेत बोलण्यास सुरुवात करतात हे अत्यंत चुकीचे असून यापुढे कोणाशीही बोलताना मराठीतच बोला  आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असे आवाहन राज ठाकरे यांनी  नवी मुंबई येथे सुरू असलेल्या दुसऱ्या विश्व मराठी संमेलनात केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर…”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “शासनानं मराठीवर फक्त एवढे उपकार करावेत”

महाराष्ट्र राज्य सरकारने  मराठीसाठी जे करायचे ते करावे . भवन बनवा ,मराठी विश्वकोष  वास्तू निर्माण  करा पण इतर सर्व भाषांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करा असे आवाहन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केले. अमेरिकेत राहणाऱ्या बांधवांनी शंभर पेक्षा जास्त मराठी शाळा सुरू केल्या असताना महाराष्ट्रात मात्र मराठी शाळा बंद पडत आहे ही मोठी खंत आहे. राष्ट्रभाषेचा  निवाडा हा कधीच झाला नाही. केंद्र व राज्य शासनाच्या संवादाची भाषा ही हिंदी आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे बोलण्यात हिंदी का वापरतात. मराठी भाषा बाजूला करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करा

देशाच्या पंतप्रधानांना सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्येच उभारावा असं वाटतं. झवेरी बाजारसह महत्वाच्या वास्तु गुजरातमध्ये घेवून जाव्याशा वाटतात तर आम्हाला आमच्या मराठीचा अभिमान का नको? राज्य सरकार शासनाने बोटचेपे  धोरण बंद करावे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. त्यामुळे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य कराच असा आग्रह राज ठाकरे यांनी केला. आहे.

मराठी माणूस घरंगळत जायला गोटया आहे का?

मराठी माणूस  गोट्या आहोत का? कोणी सांगेल तसं घरंगळत जायला? कोणीही  समोर येऊ देत यापुढे मराठीत बोला. आपणच सवय लावली पाहिजे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी मराठीत बोला. मराठी माणसाला गुजराती वस्तीत घर देत नाहीत हे चालणार नाही. आम्हाला काय गरीब समजता का महाराष्ट्रात जाऊन फिरा आमच्या मराठीपणात केवढी श्रीमंती आहे ते कळेल. दक्षिणेकडील राज्य आपल्या मातृभाषेतच बोलतात त्यामुळे आपणही यापुढे मास्तृभाषेतच बोलूया असा पण करा. राज ठाकरे , अध्यक्ष, मनसे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray appeal to speak in marathi at second world marathi conference in navi mumbai zws