पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातापायाला औषधाच्या पट्या घालून आले आणि मनसेचे पदाधिकारी पालिकेत शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस आणि महाराष्ट्र सूरक्षा बलच्या जवानांनी मनसेच्या पदाधिका-यांना पालिकेच्या प्रवेशव्दारावरच रोखून ठेवले.
अतिवृष्टीमध्ये कळंबोलीत दोन ते तीन फुट पाणी साचले. पनवेल महापालिका प्रशासनाने काय नियोजन केले होते. याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर जमा झाले होते. मात्र त्यांना आंदोलनापूर्वीच रोखल्याने मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. मनसेने गुरुवारच्या मोर्चाला हँडिकॅप मोर्चा असे नाव दिले आहे. मनसेचे पदाधिकारी डोक्याला व हाताला हॅंडिकॅपच्या पट्या लावून आले होते.
पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले. #panvel #potholes #mns #maharashtranabnirmansena #mnsprotest pic.twitter.com/2vL84yQ16v
— LoksattaLive (@LoksattaLive) July 11, 2024
हेही वाचा…पनवेल : महाराष्ट्र भवनासाठी सिडको १२१ कोटी रुपये खर्च करणार
महानगर गॅसवाहिनीचे काम पालिका क्षेत्रात सूरु असल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. सामान्य पनवेलकरांनी चालावे कुठून असा प्रश्न यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पालिकेने खड्यांची कायमची दुरुस्ती करण्याऐवजी खडीने हे खड्डे भरल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. या खड्यात शाळेतली मुले, महिला, दुचाकीस्वार पडत असल्याने हे जीवघेणी खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे अपेक्षित असताना पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.