नवी मुंबई: वाशीतील सेंट लॉरेन्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्याने त्यांना काढून टाकण्यात आले आहे. असा दावा करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. त्यावर विद्यार्थ्यांना घेण्यास शाळेने सकारात्मक भूमिका घेतली मात्र पालकांनी लेखी माफी मागितली पहिले असा पावित्रा शाळेने घेतला आहे. असेही मनसे विद्यार्थी सेनेने दावा केला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेत सोमवारी मधल्या सुट्टीत शाळेतील स्वच्छता ग्रहा बाहेर सहज गप्पा मारत असताना जय श्रीराम म्हणून घोषणा दिल्या. हे सर्व विद्यार्थी दहावीची आहेत. एकाने घोषणा दिली म्हणून इतरांनीही त्याची री ओढत घोषणा दिली. या घोषणा ऐकताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना दरडावले आणि त्यातील सहा विद्यार्थ्यांना थेट काढून टाकले. सुरवातीला मुलांच्या भवितव्याचा विचार करत या बाबत कोणीच पालक पूर्ण माहिती देण्यास तयार नव्हते. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी आज शाळेसमोर जय श्रीरामाच्या घोषणा देत आंदोलन केले. विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळा सोबत शाळा प्रशासनाने चर्चा केली व विद्यार्थ्यांना परत  घेण्यास तयार आहोत मात्र त्यांच्या पालकांनी माफीनामा लेखी द्यावा अशी अट  घातली. ही सर्व माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वाशी प्रमुख सचिन कदम यांनी दिली आहे. आंदोलन वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता. 

आणखी वाचा-नवी मुंबई: शाळेत दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा, विद्यार्थ्यांचे शाळेतून निलंबन

विद्यार्थी खूप आरडा ओरडा करीत होते. म्हणून ही कारवाई झाली आहे. जय श्रीरामाच्या घोषणा आम्ही कोणीही ऐकल्या नाहीत. विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आले नाही तर निलंबन करण्यात आले आहे. शाळेच्या शिस्तीनुसार ही कारवाई झाली असून पालकांशी चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीत. -सायरा कॅनडी (मुख्याध्यापिका )

विद्यार्थ्यांचा आरडा ओरडा असल्याने ही कारवाई केली.मात्र काही गैरसमज झाला असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अशा शब्दात शाळा प्रशासनाने लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns vidyarthi sena movement was removed from the school by the students who were chanting jai shri ram mrj