नवी मुंबईतील गोठीवली गावात मायलेकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेखा सिंग (वय ५८) आणि मुलगा सुरज सिंग (वय ३५) अशी त्यांची नावे असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
गोठीवली गावातील नेहा रेसिडेन्सी गृहसंकुलात रेखा सिंग, त्यांचा मुलगा सुरज आणि मुलगी असे तिघे जण राहतात. गुरुवारी सकाळी रेखा सिंग यांची मुलगी बेडरुममधून बाहेर आली असता तिला आई आणि भावाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.