स्वच्छतेसाठी शहरात उभारली चळवळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ला सामोरे जाताना स्वच्छता ही केवळ अभियानापुरती करण्याची गोष्ट नाही, तर ती आपली नियमित सवय असायला हवी, या भूमिकेतून ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे ब्रीदवाक्य नागरिकांसमोर ठेवत नवी मुंबईकरांच्या सक्रिय सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली होती.

विविध विभागांमध्ये राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपक्रम, कार्यक्रमांमध्ये नागरिकांनीही सहभाग घेत स्वच्छतेचा जागर केला. शहरात ठिकठिकाणी भिंतींवर रंगविलेले स्वच्छता संदेश, स्वच्छताविषयक संदेश असणारे आकर्षक फलक यामुळे नवी मुंबई स्वच्छता संदेशांनी सजली होती.

स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी हस्तपत्रके, विद्यार्थी व नागरिकांच्या रॅली, पथनाटय़ांचे सादरीकरणे, सातत्याने राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमा,

पालिका सेवेतील वाहने व बसेसवर स्वच्छ सर्वेक्षणबाबत माहितीपत्रके, ऑडिओ व्हिज्युअल प्रसार, विशेष जिंगल बनवून त्याचे प्रसारण, महानगरपालिकेच्या कचरा गाडय़ांवर स्वच्छतेच्या जिंगल लावून लोकसंवाद साधण्यात आला. यातून नागरिकांनी सक्रिय सहभाग देत विविध उपक्रम राबविण्यात आले.

शालेय चित्रकला स्पर्धेत १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छतेच्या संकल्पना रेखाटल्या.  स्वच्छताविषयक शॉर्टफिल्म्स बनवून युवकांनी स्वच्छता संदेश प्रसारणात कल्पकता प्रदर्शित केली. स्वच्छ गणेशोत्सव स्पर्धेत उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याचे फलित म्हणून आज देशात नवी मुंबई शहराचा गौरव झाला.