नवी मुंबई: २०१२ पासून शहरातील दिव्यांगांच्या मागण्या प्रलंबित असून वेळोवेळी केवळ पोकळ आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे संतप्त दिव्यांगांनी सोमवारी रात्री पासून थेट सिडको भवन मध्ये ठिय्या मांडला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत सिडको भवन मधून बाहेर पडणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.  

दिव्यांगांना स्वयंरोजगार साठी २०० चौरस फूट जागा देण्यासंबंधी २०१२ पासून प्रश्न प्रलंबित आहे. या प्रकरणी थेट न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. न्यायालयानेही दिव्यांगांना जागा देण्याचे निर्देश दिले होते. असा दावा आंदोलकांनी केला आहे. २०१७ नंतर प्रहार संघटनेने अनेक आंदोलन केली मात्र सिडकोने काहीच दाद दिली नाही. मे  मध्ये सिडको आणि दिव्यांग यांच्या दरम्यान एक बैठक पार पडली होती. यात दिव्यांगांना एका महिन्यात जागांचे वाटप केले जाईल असे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी अनेकवेळा बैठका झाल्या मात्र त्यावर केवळ पोकळ आश्वासने दिली गेली आहेत.

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

आणखी वाचा-कांदा बटाटा बाजारातील गाळ्याचा सज्जा कोसळला

अखेर सोमवारी संतप्त दिव्यांगांनी रात्रीच सिडको प्रवेशद्वारावर  आंदोलन सुरू केले आहे. सध्या सिडकोच्या तळमजल्यावर ठिय्या आंदोलन सुरु आहे.  याविषयी अधिकची माहिती प्रहार संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष  सुरेश मोकल यांनी सांगितले कि न्यायालयाच्या आदेशा नंतर केवळ सात  जणांना जागा वाटप केले गेले आहे. एकूण वाटप १५ जणांना कारणे क्रमप्राप्त आहे. एक महिन्यात वाटप झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे सिडको सह व्यवस्थापक यांनी बैठकीत सांगितले होते. मात्र हि सर्व आश्वासने पोकळ ठरली. त्यामुळे सोमवार रात्री पासून सिडको भवनात आम्ही ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. 

दरम्यान याबाबत सिडको जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

Story img Loader