राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा स्वाभिमानी मेळावा शनिवारी कळंबोली उपनगरामधील शामल मोहन पाटील विद्यालयाच्या मैदानावरपार पडला. या मेळाव्यात शरद पवारांपासून ते जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. त्यात खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण लक्षवेधी ठरले. ऐतिहासिक दाखले देत आणि लघुकथा सांगत कोल्हे यांनी राज्य सरकार आणि अजित पवार गटावर बोचरी टीका केली. अजित पवार गटाने महिन्याभरापूर्वी कर्जत येथे पक्षाचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात शरद पवार गटावर टीकाटिप्पणी करण्यात आली होती. कोल्हे यांनी या शिबिराचा उल्लेख करताना म्हटले की, कर्जत तालुका रायगड जिल्ह्यात येतो. तेव्हा कर्जतमध्ये येऊन डरकाळ्या फोडताना पाहून किल्ले रायगडानेही डोळे वटावरून पाहिले असेल.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

“कर्जतचे शिबिर झाले, तेव्हा किल्ले रायगडाने डोळे वटारून पाहिले असेल. त्या शिबिरात, रायगडाच्या मातीचा उल्लेख केला, स्वाभिमानाच्या उदाहरणांचा उल्लेख केला. मात्र त्याच शिबिरात नकली आयाळ लावलेले सिंह डरकाळ्या फोडत होते, तेव्हा रायगडानेही त्या सिंहाकडे सुद्धा डोळे वटावरून पाहिले असेल. रायगड म्हणाला असेल, माझ्या अंगाखांद्यावर खेळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात उभे राहिल्यानंतर स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती. आज दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे, याच मातीत येऊन बोलतायत”, अशी टीका करताना कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचे नाव घेता टीका केली.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन

हे वाचा >> अखंड देशाचा विकास न करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता  – शरद पवार

खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “लाचारीच्या भावनेनं पायावर डोकं ठेवण्यासाठी मान झुकवली तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही, म्हणून फक्त पक्षाच्या शिबिरामध्ये डरकाळ्या फोडणारे कधीच दिल्लीश्वरांना प्रश्न विचारू शकत नाहीत. आमच्या कांद्याची निर्यात का बंद केली? माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहीजे आणि माझ्या महाराष्ट्रातील उद्योगधंदे का पळविले? हे प्रश्न दिल्लीश्वरांच्या डोळ्यात डोळे घालून विचारू शकता का?” कर्जतच्या शिबिरात स्वाभिमान आणि विकासाच्या गप्पा मारण्यात आल्या. पण स्वाभिमान आणि विकास कुठं आहे, असा प्रश्न जनता आज विचारत आहे, असेही कोल्हे म्हणाले.

शरद पवार चंदनासारखे झिजले

“शरद पवार यांनी २५ वर्ष पक्षाला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. पक्षाला वाढविण्यासाठी, मान्यता मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आजाराची पर्वा केली नाही. अविरत धावत राहिले. अशा शरद पवारांना जेव्हा निवडणूक आयोगात जाताना आम्ही पाहिलं. तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हाच महाराष्ट्राने निर्णय घेतला की ज्यांनी अख्खी ५५ वर्ष महाराष्ट्रासाठी चंदनासारखा देह झिजवला, त्यांना दगा देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.

पक्ष फोडणारे चाणक्य कसले?

राज्यात नवीन चाणक्य तयार झाल्याच्या चर्चांचाही समाचार अमोल कोल्हे यांनी घेतला. ते म्हणाले, “जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात, तेव्हा अंधभक्ताच्या टोळ्या तयार होतात आणि या टोळ्या कुणालातरी चाणक्य म्हणतात. याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड आणि माणसं गोळा कर… याला कुणी चाणक्य म्हणतं का? पक्ष फोडून पुरुषार्थ गाजवता येत नाही. ज्याच्या मनगटात ताकद असते, तो स्वतःच्या हिमतीवर माणसं गोळा करून पक्ष वाढवतो. पक्ष फोडण्यात कसला आलाय पुरुषार्थ?”

पंतप्रधानांमध्ये अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी नाही

देशाच्या प्रधानमंत्रींनी मुंबईचा हिरा उद्योग गुजरामधील सूरतला नेला. आज त्यांच्या हस्ते सूरतमध्ये हिरा उद्योग प्रकल्पाचे मुहूर्तमेढ रचली जात आहे. मात्र हा हिरा उद्योग आम्ही मुंबईला टिकविण्यासाठी त्यावेळी व्यापाऱ्यांना जागा दिली. यामुळे हजारोंना रोजगार मिळाले. प्रधानमंत्र्यांनी मुंबईचे विकास प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याची काळजी घेतली. त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याचा आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

Story img Loader