एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तरी त्याचे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस कडे आहे. शिवसेनेचे ज्याप्रमाणे तुकडे झाले तसेच भाजपचे सुद्धा होऊ द्या, त्याचा एमआयएमलाच फायदा होईल, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्पियाज जलील यांनी केले आहे. औरंगाबादचे नामांतरण हे पाप धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणणाऱ्या एनसीपी आणि कॉंग्रेसचे आहे. एआयएमआयएमचे पहिले राष्ट्रीय आदिवेशन असुदुद्दिन ओवेसी यांच्या अध्यक्षतेत मुंबईत होत असून त्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत खासदार इम्पियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले.
हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना छोटा रिचार्ज भेटून गेला”; ठाकरे- केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका
न्यायालयात प्रकरण सुरु असताना औरंगाबादचे नामकरण केले. याचा अर्थ भाजपा आता न्यायालयालाही जुमानत नाही . शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर केले आणि जिल्ह्याचे नाव आहे तेच आहे. ज्या शहराला एवढ्या मोठ्या माणसाचे नाव दिले. त्या शहरात आठ दिवसाला पाणी आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, बेरोजगार वाढत आहेत अगोदर असे प्रश्न हाताशी न घेता भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे.औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामकरण केल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. हा निर्णय आघाडी सरकार वेळी झाला त्यात एसीपी आणि काँग्रेस हे सहकारी पक्ष होते त्यामुळे आता त्या पक्षातील जेष्ठांनी समोर येऊन अभिनंदन करावे, असे आवाहन जलील यांनी केले. व्हिक्टोरिया टर्मिनसचेही नामकरण केले मात्र हे स्टेशन इंग्रजांनी बांधले हा इतिहास बदलू शकत नाही, असे जलील यांनी मत व्यक्त केले.
शिवसेनेचे दोन तुकडे झाले अजून तुकडे होऊ द्या भाजपचे सुद्धा असेच तुकडे होऊ द्या त्याचा फायदा आमच्या पक्षाला होईल, असे बेधडक वक्तव्य खासदार जलील यांनी केले.