पनवेल : दर महिन्याच्या वेतनाची ७ नव्हे तर १० तारीख उलटूनही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पनवेल आगार येथे घंटानाद करुन आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पनवेल : भावाकडून बहिणीवर अत्याचार

प्रत्येक ऋतूमध्ये तसेच सणासुदीत एसटी गाड्या चालवून प्रवाशांना त्यांच्या निश्चितस्थळी सूरक्षित पोहोचविणाऱ्या एसटी कामगारांना मागील महिन्याचे वेतन न मिळाल्याने एसटी कामगारांसोबत प्रवाशांच्यावतीने संताप व्यक्त केला जात आहे. पनवेलप्रमाणे मुंबई विभागातील विविध आगारामध्ये  कर्मचाऱ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc employees protest in panvel over unpaid june month salaries psg