नवी मुंबई : सातत्याने वाढणारी लोकसंख्या व शहरातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेलापूर येथे नवी मुंबई महापालिकेचे बहुमजली पार्किंग अंतिम टप्प्यात असताना महापालिकेने शहरातील पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना म्हणून वाशी रेल्वेस्थानक तसेच बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ उपलब्ध भूखंडांवर पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचे नियोजन केले आहे.

सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथे ६९० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर ३० ए, वाशी येथे हॉटेल तुंगासमोर ११ हजार ३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असून या दोन्ही वाहनतळांची जागा रेल्वे स्थानकांजवळ आहे. दोन्ही भूखंडांचे तत्परतेने सर्वेक्षण करून जलद कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी अभियंत्रिकी व मालमत्ता विभागांना दिले आहेत. या दोन भूखंडांवर नियोजित दोन्ही वाहनतळ शासन व खाजगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याचे नियोजन आहे.

Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
How to park a car fell down from first floor car parking fail video viral on social media car parking tips
पुण्यात पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरुन कार कोसळली; तुमच्याबरोबर ‘हे’ घडू नये म्हणून गाडी पार्क करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
parking issue in mumbai
Parking Issiue in Maharashtra: महाराष्ट्रातल्या पार्किंगच्या समस्येवर जपानी तोडगा! प्रस्तावित प्रणालीमध्ये वाहन नोंदणीपासून अतिरिक्त शुल्काचाही समावेश
pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?

हेही वाचा – नवी मुंबई : ठोक मानधनावरील शिक्षकांबाबत नवा प्रस्ताव द्या, नगरविकास विभागाकडून महापालिकेला आदेश

महापालिकेला प्राप्त झालेल्या वाशी व बेलापूर येथील भूखंडांवर पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आयुक्तांच्या आदेशाने करण्यात येत आहे. – अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता

हेही वाचा – नैना क्षेत्रात मेट्रोची धाव, सिडकोकडून सूचिबद्ध आराखड्यासाठी हालचाली सुरू

बेलापूरची पार्किंग सुविधा कधी?

नवी मुंबई महापालिकेने बेलापूर सेक्टर १५ येथे बहुमजली पार्किंग सुविधा तयार केली असून या बहुमजली वाहनतळ इमारतीत ४७६ चारचाकी तर १२१ दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे.

Story img Loader