नवी मुंबई: वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडला आहे. त्याचबरोबर इतर बाजारांचीही दयनीय अवस्था होत आहे. फळ बाजारातील गाळ्यांचे स्लॅब कधीही कोसळतील अशा स्थिती आहेत. दिवसेंदिवस फळ बाजाराची दुरवस्था होत आहे. या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यानंतरतरच एपीएमसी जागी होणार का? अपघातानंतरच डागडुजी करणार का? असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.

सन ११९० मध्ये एपीएमसी प्रशासनाने ठेकेदार पद्धतीने भाजीपाला व फळ बाजार समिती स्थापन केली होती. तेव्हापासून आजतागायत या आवारातील इरमातींची देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फळ बाजारात देखभाल, रंगरंगोटी, दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

हेही वाचा >>>शहरबात : सावध ऐका, पुढच्या हाका! हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीनंतर आता कोण…

फळ बाजारात एक हजार २९ गाळे आहेत. मात्र मुंबईतील बाजार समिती वाशी येथे स्थलांतरित झाल्यापासून बाजार समितीत आद्याप एकदाही डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी झालेली नसल्याने दुरवस्था झाली आहे. फळ बाजारातील गाळे बाहेरून जीर्ण झाले असून, स्लॅब पडत आहेत. स्लॅब पडले असून लोखंडी सळया दिसत आहेत. आजही काही गाळ्यांचे स्लॅब पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र एपीएमसीचे संचालक मंडळ आणि प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी फुरसत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून उमटत आहे.

एपीएमसी बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फळे, भाजीपाला व कांदा बटाटा बाजारातील व्यापारी गेल्या तीस वर्षांपासून दुरुस्ती न झालेल्या व मोडकळीस आलेल्या बाजाराची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी करीत आहेत.

हेही वाचा >>>पुण्यातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा

फळ बाजारातील सामायिक जागेत असलेल्या छताची दयनीय अवस्था झाली आहे. हे छत जीर्ण झाले असून त्यातील लोखंडी सळया दिसत आहेत. तसेच पदपाथवरील लाद्या तुटलेल्या फलआहेत. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथील सामायिक जागेतील पॅसेजची दुरुस्ती करावी अशी मागणी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे.- संजय पिंपळे, व्यापारी, एपीएमसी फळ बाजार

Story img Loader